विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी आपला गट सावरण्यासाठी आणि इथून पुढे तरी आपले आमदार अजितदादांकडे जाऊ न देण्यासाठी जी राजकीय बांधबंधिस्ती सुरू केली त्यात शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे महाराष्ट्रातल्या प्रचार प्रमुख पदाची सूत्रे सोपवली आहेत. पण महाराष्ट्रातल्या प्रचार प्रमुख पदाची सूत्रे सोपवल्यानंतर शरद पवार हे डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबतीत भाजप सारखेच पुढचे पाऊल टाकणार का?? हा सवाल तयार झाला आहे. Dr. Amol Kohle NCP campaign head, but will he be chief ministerial candidate for sharad pawar faction??
मोदी आधी प्रचार प्रमुख होते
कारण भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी 2012 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय प्रचार प्रमुख पदीच नेमले होते. गोव्यात झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात नरेंद्र मोदींची भाजपच्या प्रचार प्रमुखांनी नियुक्ती झाली. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित झालेले नव्हते. परंतु, त्यांना भाजपचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख नेमल्यानंतर त्यांच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत होते आणि त्यानुसार साधारण वर्षभरातच म्हणजे 2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले.
अमोल कोल्हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार??
राष्ट्रवादीतल्या नव्या फुटी नंतर डॉ. अमोल कोल्हे यांना शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. स्वतः अमोल कोल्हे यांनी ट्विट करून ती जबाबदारी आपण आनंदाने स्वीकारत असल्याचे जाहीर केले आहे. पण पवारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना महाराष्ट्रात प्रचार प्रमुख नेमणे म्हणजे एक नवा गडी राष्ट्रवादीत मोठ्या पदासाठी तयार करून ठेवणे, असा त्याचा राजकीय अर्थ आहे का?? की डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या “मनातले मुख्यमंत्रीपदाचे” राष्ट्रवादीतले “सरप्राईज कॅंडिडेट” आहेत??, हा सवाल तयार झाला आहे.
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार अमोल कोल्हेंनी दाखविली राजकीय प्रवासाची सूचक दिशा!!
एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर कार्यकारी अध्यक्ष नेमल्यानंतर अवघ्या महिनाभरात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजित पवार अनेक आमदारांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील होण्यासाठी निघून गेले आणि त्यांनी स्वतःच आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा असल्याचा दावा करून निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे… https://t.co/C0uCtZQmBg — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब, महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे… https://t.co/C0uCtZQmBg
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023
अमोल कोल्हेंचे राजकीय भवितव्य काय??
या पार्श्वभूमीवर उरलेली राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने पवारांनी संघटनात्मक बांधबंधिस्ती केली आणि या बांधबंधिस्तीत डॉ. अमोल कोल्हेंना प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली. पण ही प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट इंटॅक्ट ठेवण्यासाठी की अमोल कोल्हे यांचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी??, याचे उत्तर मात्र पवारांनी दिलेले नाही. अमोल कोल्हे यांनी ते मागितले आहे की नाही याची माहिती नाही, पण अमोल कोल्हे हे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख म्हणून बनवून स्वतःचे राजकीय भवितव्य घडविणार की खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करणार??, हे आगामी काळात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more