• Download App
    घाबरू नका येणार तर मोदीच ; केंद्र सरकारवर टीका करणाऱ्यांना अनुपम खेर यांनी फटकारले।Dont worry...ayega to modi hi, Anupam kher slogan in tweet reply

    घाबरू नका येणार तर मोदीच ; केंद्र सरकारवर टीका करणाऱ्यांना अनुपम खेर यांनी फटकारले

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोनाच्या हाहाकारामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या टिकाकारांचा समाचार अभिनेते अनुपम खेर यांनी घेतला आहे. सेलिब्रेटी आणि सामान्य नागरिक यांनी टीका केली होती. खेर यांनी एका ट्विटला उत्तर देताना म्हटले, घाबरू नका…येणार तर मोदीच. Dont worry…ayega to modi hi, Anupam kher slogan in tweet reply

    देशात कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली तेव्हापासून सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली होती. रविवारीदेखील असेच झाले. मात्र, अनुपम खेर यांना रहावले नाही. त्यांनी मोदींविरोधातील ट्विटला उत्तर दिले. या ट्विटमध्ये सरकारवर टीका करण्यात आली होता. याला उत्तर देताने अनुपम खेर यांनी लिहिले की, आदरणीय, हे आता जास्तच झाले. तुमच्या स्टँडर्डहूनही.



    कोरोना एक संकट आहे, सर्व जगासाठी. या महामारीचा सामना आम्ही आधी कधीच केला नाही. सरकारवर टीका जरुरीची आहे. पण कोरोना संकटाविरोधात लढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेही घाबरू नका, येणार तर मोदीच. या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर संतापले आहेत. त्यांनी खेर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

    Dont worry…ayega to modi hi, Anupam kher slogan in tweet reply

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर