वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या हाहाकारामुळे केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या टिकाकारांचा समाचार अभिनेते अनुपम खेर यांनी घेतला आहे. सेलिब्रेटी आणि सामान्य नागरिक यांनी टीका केली होती. खेर यांनी एका ट्विटला उत्तर देताना म्हटले, घाबरू नका…येणार तर मोदीच. Dont worry…ayega to modi hi, Anupam kher slogan in tweet reply
देशात कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली तेव्हापासून सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली होती. रविवारीदेखील असेच झाले. मात्र, अनुपम खेर यांना रहावले नाही. त्यांनी मोदींविरोधातील ट्विटला उत्तर दिले. या ट्विटमध्ये सरकारवर टीका करण्यात आली होता. याला उत्तर देताने अनुपम खेर यांनी लिहिले की, आदरणीय, हे आता जास्तच झाले. तुमच्या स्टँडर्डहूनही.
कोरोना एक संकट आहे, सर्व जगासाठी. या महामारीचा सामना आम्ही आधी कधीच केला नाही. सरकारवर टीका जरुरीची आहे. पण कोरोना संकटाविरोधात लढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेही घाबरू नका, येणार तर मोदीच. या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर संतापले आहेत. त्यांनी खेर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App