पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार म्हणतात, मला देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही!!

प्रतिनिधी

पुणे : 2019 च्या निवडणूक निकालानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेवरून देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी अजब प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया व्यक्त करून मला फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, असे पवार म्हणाले आहेत. Don’t increase the importance of Devendra Fadnavis : sharad pawar

भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये माझ्याबरोबर अजित पवारांशी झालेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनेच सगळे झाले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता खुद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडेंच्या घर आणि कार्यालयावर इन्कम टॅक्सचे छापे


पुण्यात आयोजित ‘बॅंकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषद’ या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आता मला देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सुनावणीत काय होणार? हे सांगणे कठीण आहे.

 पोटनिवडणूक प्रचारात शरद पवार

दरम्यान कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारही मैदानात उतरले आहेत. येत्या २२ फेब्रुवारीला कसबा पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी ४ ते ९ पवारांची सभा होणार आहे, तर त्या दिवशी सकाळी ११ वाजता चिंचवड विभानसभा पोटनिवडणुकीसाठी सभा घेणार आहेत.

Don’t increase the importance of Devendra Fadnavis : sharad pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात