विशेष प्रतिनिधी
मुंबई : इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुडेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप नेत्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन देखील सादर केले आहे.Don’t hold elections till Imperial data comes, demands Pankaja Munde to Election Commission
भाजप नेत्या पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्या संदर्भात एक निवेदन आयोगाकडे सादर केले आहे.
यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे.मुंडे म्हणाल्या की, राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांची भेट घेऊन
ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसी उमेदवारांनी फक्त ओबीसी आरक्षीत जागांसाठी उमेदवारी अर्ज केले आहेत, त्यांनी खुला प्रवगार्साठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत. आमची मुख्य मागणी ही ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूका होऊच नयेत अशी आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे इंपेरिकल डाटा उपलब्ध होईपर्यंत, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणार असतील तर सर्वांना समान न्याया प्रमाणे सर्वांसाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आत्ताची निवडणूक प्रक्रिया आरक्षणासह असल्यामुळे सर्वांना उमेदवारी अर्ज भरता आले नसल्यामुळे ती रद्द झालीच पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App