प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थिर असताना आणि त्याचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असताना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मात्र मुख्यमंत्री पदाची स्पर्धा हळूहळू तीव्र होत चालली आहे. इतकेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिंदे – फडणवीस सरकार अस्थिर असल्याचा राजकीय नॅरेटिव्ह चालवून अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पेरल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वपक्षीयांचेच कान टोचले आहेत. Don’t day dream of chief ministership until NCP’s political strength is increased, jayant patil told partymen
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आणि आपल्यात कोणतीही स्पर्धा नाही. पक्षाची ताकद वाढून पक्ष मोठा झाल्याशिवाय कोणी पुढची स्वप्ने पाहू नयेत, अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी स्वपक्षीयांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राला उच्चशिक्षित सुसंस्कृत मुख्यमंत्री हवा असेल तर जयंत पाटलांसारखा आदर्श दुसरा कोणी नाही, अशा शब्दांत त्यांची स्तुती केली होती. त्यामुळे जयंत पाटलांचे नाव राष्ट्रवादीतूनच स्पर्धेत आणले गेले, असे नॅरेटिव्ह पक्षात तयार झाले. स्वतः अजित पवारांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाच्या रिंग मध्ये आधीच आपली हॅट टाकून दिली आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचेच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटलांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया आधीच उंचावल्या.
या पार्श्वभूमीवर स्वतः जयंत पाटलांनी त्या संदर्भात खुलासा करताना आपले नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतच नाही, असे सांगून ते मोकळे झाले आहेत. पण त्याच वेळी पक्षाची ताकद वाढून पक्ष मोठा झाल्याशिवाय कोणी पुढची स्वप्न पाहू नयेत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघणार्यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App