विशेष प्रतिनिधी
सांगली : येथील वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.Doctor of Sangli On indefinite strike
या संपामध्ये सांगली आणि मिरजेतील सुमारे ३०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आज जोरदार निदर्शने केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App