प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे, जागरणे यामुळे त्यांना अतिश्रम झाले आणि म्हणून त्यांना डॉक्टरांनी आज आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व शासकीय कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत. मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करून तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. Doctor advises Eknath Shinde to rest due to overwork
आज सुप्रीम कोर्टात झालेली सुनावणी आणि उद्याचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे भाजपश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज आरामाचा सल्ला आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा हा विलक्षण योगायोग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दौऱ्यामुळे त्यांना थकवा आला आहे. रात्रीची जागरणे, रात्रीच्या सभा आणि स्वागत समारंभ, पूरग्रस्त भागाचा दौरा यामुळे मुख्यमंत्र्यांना नियमित विश्रांती मिळालेली नाही आणि म्हणून त्यांना डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते एकनाथ केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना थोडा थकवा आला आहे त्यामुळे थोडा आराम करून ते कामाला लागू शकतील, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App