एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; राज्य सरकारची महामंडळाला 300 कोटींची मदत

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शिंदे – फडणवीस सरकारने एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रूपयांची मदत एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रूपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने ३०० कोटी रूपयांचीच मदत जाहीर केली आहे. Diwali sweet for ST employees; 300 crore aid from the state government to the corporation

मात्र, या मदतीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारने द्यावा अन्यथा, सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल, असे म्हणत बरगेंनी इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.



या महिन्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी असून कर्मचाऱ्यांमध्ये मनस्तापाचे वातावरण आहे. त्यांची गैरसय झाली आहे. याबाबत कोर्टात त्रिसदस्यीय समितीने अहवाल दिला आहे. त्यानुसार चार वर्षे वेतनासाठी तरतूद केली आहे. मात्र, चार वर्षे पूर्ण होण्याअगोदरच अनियमितता सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असल्याचे बरगे म्हणाले.

Diwali sweet for ST employees; 300 crore aid from the state government to the corporation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात