विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी व सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचारी संघटना आणि कृती समितीसोबत आज सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा आणि वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर केला.
यानुसार सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध एसटी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App