विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.Diwali celebrations in Thane and the grand opening of development works
– राजमाता जिजाऊ उद्यानाचे लोकार्पण
ठाणे शहरातील हिरानंदानी मेडोज येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्यानात अनेक दुर्मीळ वनऔषधींची लागवड करण्यात आली आहे.
ठाणे शहर हे सुदंर आणि हरित शहर रहावे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. ठाणे मनपा आयुक्तांना गतवर्षी १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य दिले होते, तेव्हा त्यांनी सव्वा लाख झाडे लावली. यावर्षी त्यांना दोन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य दिले असून त्यांनी आतापर्यंत दोन लाख नऊ हजार झाडे लावली असल्याचे सांगितले.
हवामान बदलाचा मोठा फटका आपल्याला सहन करावा लागत असून जिथे कधी पाऊस पडत नव्हता, तिथे आता पूर येऊ लागला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घ्यायची गरज आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले.
याठिकाणी औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित करणे हे एक आव्हान होते. मात्र ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा आनंद आहे. इथे दुर्धर आजारावरील वनौषधी आहेत, अगदी कॅन्सरवर देखील उपाय करता येऊ शकतो अशा झाडांचा यात समावेश आहे. ज्यांना हे सारे पाहून पोटदुखी होते ती देखील कमी करणाऱ्या वनौषधी इथे असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच या कामाबद्दल ठाणे मनपाचे विशेष अभिनंदन करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, या उद्यानाचे लँडस्केपिंग करणारे प्रणव आणायल आणि ज्युली मांजरेकर, उद्यान बनवणारे आनंद पाटील, विजय पाटील आणि केदार पाटील हेदेखील उपस्थित होते.
– आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण
ठाणे शहरातील वागळे इस्टेट विभागातील जय भवानी नगर येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानाचे लोकार्पण आज करण्यात आले. यामुळे या परिसरातील नागरिकांना थोडा वेळ निवांतपणे घालवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, वागळे इस्टेटचे विभागप्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– ऑक्सीजन पार्कचे लोकार्पण
ठाणे शहरातील शिवसेना शाखा रामचंद्र नगर, क्रमांक २-३ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
स्वच्छ ठाणे अधिक सुंदर आणि हरित व्हावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी हिरानंदानी मेडोज येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात आले असून कालच त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. ठाण्यात कधी क्लस्टर होईल की नाही अशी चर्चा होती, मात्र किसन नगरच्या क्लस्टर योजनेच्या इमारती आज उभ्या राहिल्या असून ठाणे मनपा आणि सिडकोने मिळून ते काम पूर्ण केले आहे. एसआरए मध्ये क्लस्टर योजना राबवायला आपल्या सरकारने संमती दिली आहे. त्यामुळे नुसत्या इमारती उभ्या न राहता पायाभूत सुविधा, मैदाने, व्यायामशाळा, अभ्यासिका अशा सोयी सुविधा पुरवता येणे शक्य होत असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
इथे अनेक लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, सध्या विरोधक अनेक खोट्या नाट्या अफवा पसरवत असले तरीही ‘लाडकी बहिण’ योजना कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली, तसेच सर्वांना दिवाळी आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App