पश्चिम महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक कुटुंबांना अयोध्येच्या सोहळ्याचे अक्षत वाटप!!

distribution of Ayodhya ceremony to more than 50 lakh families in western Maharashtra

विशेष प्रतिनिधी

पुणे : अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असतानाच त्या सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी पोहोचले आहे. पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक कुटूंबांना अक्षता वाटप करण्यात आले आहे. 1 ते 18 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषदेने हे अक्षता वाटप अभियान घेतले. distribution of Ayodhya ceremony to more than 50 lakh families in western Maharashtra

या अभियानात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रगतिशील सरपंच पोपटराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळे मंत्री, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरीताई कानिटकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, दलित चेंबर ऑफ कॉमर्स संस्थापक मिलिंद कांबळे, राहीबाई पोपळे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला, उद्योगपती अभय फिरोदिया, अजय शिर्के, सतीश मेहता यांच्या घरी जाऊन अक्षत दिली. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून सोहळ्याचे निमंत्रण दिले.

आकडे बोलतात

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या 7 शासकीय जिल्हा क्षेत्रात 8 महापालिका क्षेत्रे, 94 तालुके, 6064 गावे, 10 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या 1503 रहिवासी परिसर येथे घरोघरी संपर्क करून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 50 लाख 89 हजार 336 कुटुंबांना अक्षत दिली. त्यासाठी 51 लाख 14 हजार 607 घरांमध्ये संपर्क साधला.

या अक्षता वाटप उपक्रमात विश्व हिंदू परिषदेच्या तब्बल 1 लाख 90 हजार 716 कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये 1 लाख 51 हजार 101 पुरूष, तर 40 हजार 219 महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.

distribution of Ayodhya ceremony to more than 50 lakh families in western Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात