वृत्तसंस्था
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत पुन्हा चौकशी करण्यासाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत त्यांनी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर FIR नोंदवण्याची आणि प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवण्याची मागणी केली आहे. सतीश सालियन यांचा आरोप आहे की त्यांची मुलगी “निर्घृणपणे बलात्कार करून हत्या” करण्यात आली आणि काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.
आदित्य ठाकरे, दिनो मोरियाचे कॉल रेकॉर्ड तपासा एकता कपूर, सचिन वाझेचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे ३ ते २० ऑगस्ट २०२० चे कॉल रेकॉर्ड चेक करा टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे अशी मागणीही सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे.
त्यांनी या याचिकेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला. किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाचा खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टेमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत दिशाच्या इमारतीचं 3 ते 10 जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं. सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं. आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांचे वकील निलेश ओझा यांनी सांगितले की याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागात तिला क्रमांक दिला जाणार आहे.
याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की मुंबई पोलिसांनी हा प्रकार आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू असल्याचे सांगून प्रकरण घाईघाईने बंद केले. पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे, परिस्थितीजन्य गोष्टी आणि साक्षीदारांचे जबाब नीट तपासले नाहीत. आधी सतीश सालियन यांनी पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवला होता, पण आता त्यांना वाटते की काही महत्त्वाची माहिती लपवली गेली आहे.
दिशा सालियन ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी याला अपघाती मृत्यू मानले होते. काही दिवसांनी, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात सापडला. आधी हे प्रकरण आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले, पण नंतर तपास CBI कडे सोपवण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App