विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर सुरुवातीला पवार कुटुंब फुटल्याच्या बातम्या आल्या. पण नंतर “डॅमेज कंट्रोल” करत रोहित पवारांनी पवार कुटुंबातील लोक एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे राहणार नाहीत, असे सांगून बारामतीत “सेफ गेम” असल्याचेच सूचित केले. Discussions in Maharashtra increased with family meetings!!
या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीगाठींमुळे पवार कुटुंब एकसंध की दुभंग??, असा सवाल तयार झाला आहे. कारण अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
त्याआधी सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वीच श्रीनिवास पवार यांना फोन करून अजितनिष्ठ गटातले नेते शरद पवारांवर शरसंधान साधत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पण त्यावेळी श्रीनिवास पवार परदेशात होते. ते भारतात आल्यानंतर अजित पवार त्यांना भेटायला गेले, तर श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीचा परिणाम पवार कुटुंबावर होऊन महाराष्ट्रातील इतर राजकीय कुटुंबांप्रमाणेच ते कुटुंब देखील फुटले अशा बातम्या आल्यानंतर पवार कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पवारांना फोन केल्याची चर्चा मराठी माध्यमांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब एकसंध की दुभंग असा असावा तयार झाल्यानंतर आजच्या भेटीगाठी घडल्या. अजित पवार यांचे सख्खे पुतणे असलेल्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली.
एकोप्याची ओळख पुसताना
महाराष्ट्रातील राजकारणात बाकीची कुटुंबे फुटली असली तरी पवार कुटुंब हे एकोप्यासाठी ओळखले जाते. मात्र अजित पवार यांच्या बंडानंतर या कौटुंबिक एकोप्यालाही धक्का बसणार का??, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता कौटुंबिक पातळीवर सौहार्याचे वातावरण कायम राहावे, यासाठीच्या प्रयत्नांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. युगेंद्र यादव हे राजकीयदृष्ट्या सक्रीय नसले तरीही बारामती शहरात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत असतात. तसंच शरद पवार हेदेखील युगेंद्र यांच्या विविध उपक्रमांना भेट देत त्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे एकीकडे अजित पवारांसोबत राजकीय संघर्ष सुरू असताना त्यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात.
युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष आणि बारामती कुस्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more