मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी!

तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा हा ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

विशेष प्रतिनिधी  :

मुंबई : देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पहिल्या समुद्री पुलाचे मुंबई ते मुख्य भूमी पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील २२ किलोमीटर्सचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच, मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी काल मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. Direct connection of the countrys longest and unique sea bridge with the mainland under the Mumbai Parbandar Project

मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर प्रकल्प ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

https://youtu.be/aIk84ExnOBg

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे याचा अतिशय आनंद होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांचा योग जुळून येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झाले होते, आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे. हा समुद्री पूल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Direct connection of the countrys longest and unique sea bridge with the mainland under the Mumbai Parbandar Project

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात