विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय बॉम्बस्फोट करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. अदानी प्रकरणावरून त्यांनी मोदी अदानींची बाजू घेत काँग्रेसवर विशेषतः राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले. पण आता त्या पलिकडे जाऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतली नाही, असा आरोप करून उद्धव ठाकरे यांच्या दिशेने देखील राजकीय बॉम्ब फेकला आहे.Did Uddhav Thackeray really resigned on his own without consulting MVA praterners??
एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांनी सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर उद्धव ठाकरे यांचे उत्तर अद्याप यायचे आहे. पण 25 जून ते 29 जून 2022 या कालावधीत घडलेल्या घडामोडींचा बारकाईने आढावा घेतला, तर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना शरद पवारांची घेतलेली भेट, त्यांची झालेली चर्चा आणि त्यानंतर मातोश्री मध्ये 29 जून 2022 रोजी फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची केलेली घोषणा यामधून उद्धव ठाकरे यांनी कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विश्वासात घेतले नसल्याचे दिसलेले नाही.
उलट उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर करताना केलेल्या भाषणात सुरुवातीलाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि त्या मंत्र्यांचे आमदारांचे खुल्या शब्दात आभार मानले आणि आपले सगळे शरसंधान एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर केले होते. जे साथ सोडतील असे आम्हाला सांगत होते, प्रत्यक्षात त्यांनी आम्हाला साथ दिली आणि जे आमचे होते शिवसेनेचे होते त्यांनी आमची साथ सोडली, असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत आम्ही मंत्रिमंडळाबाहेर पडतो. पण एकनाथ शिंदे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना परत आणा, असे आवाहन केल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी त्या फेसबुक लाईव्ह मध्ये करून दिली होती. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री म्हणून अखेरची बैठक घेतली होती, हेही सिद्ध होते.
याचा अर्थ हा राजकीय घटनाक्रम बारकाईने तपासला असता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नव्हते हा शरद पवारांचा आरोप कोणत्या निकषांवर खरा ठरतो??, हा खरा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या फ्लोअरवर शक्तिपरीक्षेला सामोरे जायला नकार दिला हे खरे. पण तो नकार देताना देखील माझीच माणसे मला सोडून गेली म्हणून मी शक्तिपरीक्षेला सामोरा जाणार नाही, असे त्यांनी त्या भाषणात स्पष्ट म्हटले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतःला साथ देणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादीचे खुल्या दिल्याने आभार मानले होते. मग इथे शरद पवार यांनी म्हटल्यानुसार उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, हा मुद्दा उद्भवतोच कुठे?, हा खरा प्रश्न आहे. पवारांनी केलेल्या या आरोपाला आता उद्धव ठाकरे नेमके काय आणि कसे उत्तर देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना महाविकास आघाडीचे भवितव्य त्यांच्या उत्तरातून ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App