Municipal Commissioner : पालिका आयुक्तांनी जरा अती केलं का ?

Municipal Commissioner

विशेष प्रतिनिधी 

पुणे: पुणे महापालिकेमध्ये बुधवारी (ता.६) माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यातला वाद चांगलाच पेटला. किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर काढेल अशी धमकी दिली तर शिंदे हे गुंडागर्दी करतात मी त्यांना घरात घुसून मारेल अशी संतप्त प्रतिक्रिया आयुक्तांनी त्यावर दिली. Municipal Commissioner



त्यादिवशी महापालिकेत नक्की झालं काय?

आयुक्त नवल किशोर राम हे पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्वच्छता अभियानासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. त्यावेळी माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांच्यासह आणखी तीन कार्यकर्ते परवानगी न घेताच आयुक्तांच्या बैठकीत घुसले. शिंदे अचानक बैठक कक्षामध्ये आल्याने महापालिका आयुक्तांनी आपण कोण आहात, असे थेट आत कसे आलात, असे विचारले, त्यावेळी शिंदे म्हणाले, मी दोन वेळा नगरसेवक होतो. चार वेळा आमदारकी लढवली आहे. परंतु आयुक्तांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला. यावर संतप्त झालेल्या शिंदेंनी आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेतली. त्यावर आयुक्त हिंदीमध्ये ‘आप बाहर निकलो’, असे म्हणाले. यावर शिंदे यांनी आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला! असे सांगितले. मी तुला महाराष्ट्राबाहेर पाठवीन अशी धमकीही शिंदे यांनी दिली. त्यावर आयुक्त संतप्त झाले. शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करत होते, अशी प्रतिक्रिया आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी आमच्याकडील मोबाईल काढून घेतला. आयुक्तांनी मराठी लोकांना गुंड म्हणणे आम्ही कदापि सहन करणार नाही. आयुक्त कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही तपासा, मोबाईलवरील चित्रीकरण तपासा, असं विधान किशोर शिंदे यांनी केलं.

पालिकेत पोलिस बंदोबस्त

हा सगळा प्रकार घडल्या नंतर पालिकेत पोलिस बंदोबस्त करण्यात आला. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस हे तातडीने पालिकेत आले. लगेचच महापालिकेची सर्व प्रमुख दरवाजे बंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर आयुक्त कार्यालयातीलही सर्व दरवाजे बंद करण्यात आले. इतकंच नाही तर शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीनही कार्यकर्त्यांवर 353 अंतर्गत गुन्हा देखील दाखल केलाय. Municipal Commissioner

आयुक्तांची प्रतिक्रिया कितपत योग्य?

महापालिका आयुक्त निवासात झालेल्या चोरी संदर्भात बोलायला आलेल्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करून आयुक्त यांना काय सांगायचंय? आयुक्तांनी सामान्य नागरिकांना गृहीत धरलं आहे असं यावरून समजायचं का?
यानंतर तरी निवासात झालेल्या चोरीसंदर्भात पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे ठोस कारवाई करणार का?

Did the Municipal Commissioner go too far?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात