नव्या शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मितीच्या मार्गावर
विशेष प्रतिनिधी
पुणे: पाठ्यपुस्तकांमधून डार्विनचा सिध्दांत वगळल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झाल्या असून केवळ एकाच पुस्तकाच दोनदा आलेली प्रकरणे कमी केली आहेत,तसंच नव्या शैक्षणिक धोरणाची पाठ्यपुस्तके तयार होत आहेत, त्यापैकी इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तके आली देखील आहेत तर लवकरच इयत्ता तिसरी ते 12 वी पर्यंतची येतील, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यात दिली. Dharmendra Pradhan’s special information about the textbooks being created according to the new education policy
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीच्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना प्रधान म्हणाले की, भांडारकर संस्था अत्यंत महत्वपूर्ण असे संशोधनात्मक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे काम करते आहे. त्यासाठी सर्वप्रकारची मदत केंद्र सरकार करेल. आपल्या देशाच्या प्राचीन वैभवशाली इतिहासाची नोंद आपण घेतली पाहिजे, ज्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
भारतातील सर्वच प्रदेशातील, राज्या-राज्यांमधील प्राचीन मंदिरे, निसर्गसंपदा यांचा अभ्यास केला तर हजारो वर्षांची असलेली परंपरा आपल्याला संपूर्ण विश्वाशी जोडता येईल, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन देखील जागोजागी दिसून येतो.
संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले, त्यावेळी बोलतांना फिरोदिया म्हणाले की, आपल्या देशात समाजाच्या उपासना पध्दती, चालीरिती जरी वेगवेगळ्या असल्या तरी हजारो वर्षांपासून आपल्या देशाचा धर्म एकच होता. दुर्दैवाने परकीय आक्रमणे झाली आणि आपल्या समाजात विषमता निर्माण केली गेली. या संपूर्ण इतिहासाचा आपण बोध घेवून सत्य जाणून घेतले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App