धर्मराव बाबा आत्राम यांना लोकसभेत पाठवणार; शरद पवारांची गडचिरोलीत घोषणा; काँग्रेसला जागा सोडणे भाग पाडणार??

प्रतिनिधी

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात एक मोठी राजकीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना लोकसभेत पाठवणार आणि भाग्यश्री धर्मराव बाबा आत्राम यांना राज्याच्या राजकारणामध्ये मोठी संधी देणार, अशी घोषणा पवारांनी गडचिरोलीतल्या आदिवासी मेळाव्यात केली आहे.Dharmarao will send Baba Atram to Lok Sabha

शरद पवारांच्या या घोषणेमुळे गडचिरोलीची मूळची काँग्रेसची जागा काँग्रेस पक्षाला सोडून देणे शरद पवार भाग पाडणार का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


शरद पवारांची चाणक्यनिती, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, गडकरींचे मात्र कौतुक, पाच वर्षांत सत्ता होती, मग, विदर्भ विकास का झाला नाही?


आदिवासी मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की आज पक्षप्रवेश झालेल्यांचे मी पक्षात स्वागत करतो. त्यांनी काही प्रश्न मांडले आहेत. रखडलेले लघुसिंचन प्रकल्प, वैनगंगा नदीवरील मंजूर झालेल्या बंधाऱ्यासंबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधू तसेच राज्य सरकारशी निगडीत प्रश्न संबंधित मंत्र्यांसमोर मांडू.

येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जि.प, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या जागांपैकी ५० टक्के जागांसाठी सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेचा अनुभव असल्यामुळे भाग्यश्री यांना अधिक काम करण्याची संधी राज्य पातळीवर द्यावी, अशी पक्षाची इच्छा आहे. त्याला इथल्या जनतेची साथ मिळेल, अशी आशा करतो.

पण जागा कमी असल्यामुळे त्यांना जागा देता आली नाही, हे दुःख आमच्या मनात आहे. ते दुःख आम्ही कधी ना कधी दूर करु. पुढच्या निवडणुकीत धर्मराव बाबांना लोकसभेला पाठवायचं आणि भाग्यश्रीला विधानसभेत निवडून द्यायच, असे आवाहन देखील शरद पवारांनी केले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आमची इच्छा होती की, विदर्भात राष्ट्रवादीला कमीत कमी तीन मंत्री तरी मिळावेत. पण आम्हाला ते मिळू शकले नाहीत, कारण जागा कमी होत्या. आमची इच्छा ही होती की तिसरी जागा धर्मरावबाबा आत्राम यांना द्यावी.

जो शेतकरी सर्वांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सोडवतो, त्याने काही मागणी केली तर केंद्र सरकार तिकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. संसदेच्या पुढील अधिवेशनात हा प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडू. सरकारने दखल घेतली नाही तर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले आंदोलन देशात इतर ठिकाणी करावे लागले, असे पवार म्हणाले.

Dharmarao will send Baba Atram to Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात