धाराशीव पोलिसांनी कंत्राटदारास ठोकल्या बेड्या; पैशाचे अमीष दाखवून कामगारांनी कामवावर आणाऱ्या आरोपीचाही शोध सुरू.
विशेष प्रतिनिधी
धाराशीव : कंत्राटदाराने डांबून ठेवलेल्या ११ मजुरांची धाराशीव पोलिसांनी सोमवारी सुटका केली. हा कंत्राटदार मोबदला न देता मजुरांकडून विहीरीचे खोदकाम बळजबरी करून घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी कृष्णा बाळू शिंदे या कंत्राटदाराला अटक केली असून, कामगारांची व्यवस्था करणाऱ्या अहमदनगर येथील आरोपी विशालचा शोध सुरू आहे. Dharashiv police freed 11 laborers who were detained by the contractor
हिंगोली जिल्ह्यातील कवठा गावातील तक्रारदार संदीप रामकिसन घुकसे (२३) हा ठेकेदाराच्या तावडीतून सुटून घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. १७ जून रोजी पोलीस ठाण्यात आलेल्या नातेवाईकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. बेड्या ठोकलेल्या कामगारांमध्ये संदीपच्या चुलत भावाचाही समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वखारवाडी गावातील रोजंदारी कामगार असलेल्या मारुती पिराजी जटाळकर हा ठेकेदाराने पळून जाऊ नये म्हणून बेड्या ठोकलेल्या व्यक्तींपैकी एक होता, असे पोलिसांनी सांगितले. ज्याने मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळावे म्हणून हे काम करण्यास घेतले होते. मात्र, डांबून ठेण्यात आल्याने ते १५ मे रोजी त्यांच्या गावातच पार पडलेल्या विवाहसमारंभास उपस्थित राहू शकले नाही.
“मला एका खोलीत लोखंडी साखळीने पाय बांधून बंद केले होते. दोन महिन्यांपूर्वी विहीर खोदण्याचे काम सुरू झाल्यापासून मला पैसे मिळाले नाहीत,” असे त्यांनी सांगितले आहे. धाराशिव पोलिसांनी मराठवाड्यातील वाखारवाडी गावातील दोन ठिकाणांहून ११ रोजंदारी कामगारांची सुटका केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजंटने त्याच्या कमिशनच्या आधारे सहा जिल्ह्यांतील कामगारांना आमिष दाखवून कंत्राटदाराकडे पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App