विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajitdada संतोष देशमुख प्रकरणांमध्ये परभणीतल्या आजच्या मोर्चामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सर्वपक्षीय आमदार आणि खासदार एकवटले, तरी अजितदादा मात्र अजून नामानिराळेच राहिलेत.Dhananjay Munden, Ajitdada is still nameless!!
परभणीतल्या मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, राजेश विटकर या सगळ्यांनी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या संबंधांवर ठळक प्रश्नचिन्ह पुन्हा उपस्थित केले. बीड मधल्या दाऊदपूर इथल्या राखेच्या कंत्राटा संदर्भात जोरदार आरोप केले तिथल्या दहशतीवर प्रखर हल्ले चढवले. या मोर्चात मनोज जरांगे यांचे देखील भाषण झाले. या सगळ्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा खोलला. या सगळ्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली यासंदर्भात सगळ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिशेने देखील वाग्बाण सोडले.
याच दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातल्या तीन मुख्य आरोपींना अटक झाली आणि न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.
बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणावर सगळे राजकीय घमासन सुरू असताना स्वतः अजितदादा मात्र पूर्ण नामानिराळे राहिले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुरुवातीला अजितदादांना टार्गेट केले, पण नंतर त्यांनी घुमजाव करत आपली तोफ फक्त धनंजय मुंडे यांच्याकडे वळवून ठेवली. आपले अजितदादांच्या विरोधात काही म्हणणे नाही, असा खुलासा नंतर बजरंग सोनवणे यांनी केला. एवढे सगळे घडून देखील अजितदादा समोर येऊन अद्याप काहीही बोललेले नाहीत.
बीडच्या पालकमंत्री पदावर धनंजय मुंडे दावा सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच बीडचे पालकमंत्री व्हावे. ते झाले नाहीत, तर अजितदादा पालकमंत्री झाले तरी चालतील, पण धनंजय मुंडे पालकमंत्री नकोत, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. त्या भूमिकेला सगळ्यांनी पाठिंबा दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App