Dhananjay Munde : धनंजय मुंडे गुन्हेगारांचा सरदार,एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये, संजय राऊत यांची मागणी

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

बीड : Dhananjay Munde  बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले. बीडमधील गावात लहान पोरं हातात बंदूक घेऊन असल्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. हे सगळे लोक एकाच गँगचे नाव घेत आहेत. त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. एकही मुंडे तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.Dhananjay Munde

जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत थेट टीका केली.



राऊत म्हणाले,आम्ही अमुक अमुक माणसाचे शुटर आहोत. तुम्ही काय पेरत आहात जे पेरलं ते उगवला आहे. मी खात्रीने सांगतो वारंवार माहिती पुढे आले आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवीन नाही. संतोष देशमुख यांचा खून त्यांना पचवता आला नाही.

ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री दुबळे आहेत. कमजोर आहेत. गृहमंत्री नाकाने कांदा सोलत आहेत. कोणाला सोडणार नाही की तेही मोठा असू द्या, तरी तो तुमच्या पदराखाली आणि तुमच्या खिशात आहे. मग तो जवळचा तुमच्या कोणी असेल, त्याला फाशीच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा”, असेही चॅलेज संजय राऊतांनी केले.या महाराष्ट्रात

कायदा सुव्यवस्था राहिली नाही. काल बीडमध्ये पोलीस स्टेशन आवारात एक हत्या झाली एक सामाजिक कार्यकर्त्याच जीवन संपवलं. बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं? काय करत आहेत देवेंद्र फडणवीस ?कायद्याचा धाक राहिला नाही. कारण पोलीस खात्यात भ्रष्टाचार वाढला पैसे दिल्याशिवाय नेमणूक होत नाही. हवालदार असतील उपायुक्त असतील जिल्हाप्रमुख असतील पोलिसांचे व्यवहार हे पैशाचा माध्यमातून होतात.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात