नाशिक : संतोष देशमुख आणि वाल्मीक कराड प्रकरणाच्या फटक्यामुळे मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे “रिकाम्या” झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज काम मागितले. छगन भुजबळांनी त्यांना लगेच कामाला लावले. असे आज रायगड मध्ये घडले. Dhananjay Munde
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकमतचा ग्लोबल पुरस्कार मिळाला म्हणून पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा रायगड मध्ये त्यांचा नागरी सत्कार केला. या सत्कार समारंभात बाकीच्या नेत्यांपेक्षा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचीच भाषणे गाजली. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात बऱ्याच दिवसांपासून लांब होते परंतु मध्यंतरी ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायला लागले पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कुठले पद दिले नाही. त्यामुळे त्यांना स्वतःला रिकामे वाटू लागले. म्हणून त्यांनी आज तटकरेंच्या सत्काराचे निमित्त साधून स्वतःच्या रिकामपणावर भाष्य केले. आता आम्हाला काहीतरी काम द्या आम्हाला रिकामे ठेवू नका, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्याआधी त्यांनी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाची भरपूर स्तुती केली. सुनील तटकरे यांना सगळ्या महाराष्ट्राचे ज्ञान आहे त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावे, पण आता इथून पुढे आम्हाला रिकामे ठेवू नये, असे धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या रिकामपणाची दखल बाकीच्यांनी घेण्याच्या पेक्षा. मंत्री छगन भुजबळ यांनी लगेच घेतली. भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडे तुम्हाला काय काम द्यायचे ते पक्ष आणि अजितदादा ठरवायचे तेव्हा ठरवतील. पण त्याआधी तुम्ही एक काम करा. आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी जो वारसा दिला आहे, तो संभाळा. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण धोक्यात आणले गेले आहे. ते ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काम करा. लोकांमध्ये जाऊन जनजागृती करा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
– भुजबळ यांनी दाखविला “कात्रजचा घाट”
धनंजय मुंडे यांनी काम मागितले आणि छगन भुजबळ यांनी ते लगेच दिले. त्यामुळे दोघांच्या भाषणाची चर्चा महाराष्ट्रात जोरदार रंगली. पण छगन भुजबळ यांच्या सल्ल्यामुळे धनंजय मुंडे यांना खरंच काम मिळाले की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले हे येणारा काळाच सांगेल. कारण धनंजय मुंडे यांना असे कुठले काम नको असून त्यांना फक्त मंत्रिपद हवे आहे. ते मूळातले संघ आणि भाजप संस्कारित असले तरी मध्यंतरीच्या काळापासून ते पवार संस्कारित अधिक झालेत. त्यामुळे सत्ता म्हणजेच सेवा आणि सेवा म्हणजे सत्ता हेच समीकरण त्यांच्या डोक्यात भिनले आहे म्हणूनच त्यांनी तटकरेंच्या सत्काराचे निमित्त साधून स्वतःसाठी काम मागितले. याचा अर्थ मंत्रीपद पुन्हा मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली, पण छगन भुजबळ यांनी त्यांना ओबीसी आरक्षण टिकविण्याचे काम लावून व्यवस्थित “कात्रजचा घाट” दाखविला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App