विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटमधील नोंदींनुसार न्याय मिळत असेल, तर आमच्या बंजारा समाजालाही एसटीचे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विचार करावा लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंजारा व बंजारा एकच असल्याचा दावाही केला. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हणत हरिभाऊ राठोड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.Dhananjay Munde
हरिभाऊ राठोड म्हणाले, बंजारा वंजारी हे एक नाहीत, मी गोपीनाथ मुंडे यांचा खासगी सेक्रेटरी असताना देखील ही भूमिका घेतली होती. आपण भाऊ-भाऊ आहोत, सामाजिकदृष्ट्या ठीक आहे. मात्र, आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे, असे परखड मत बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. यापूर्वीच मी ही बाब सांगितलेली आहे. त्यामुळे, तो फॉर्म्युला आत्ता वापरायला नको, असे राठोड यांनी म्हटले आहे.Dhananjay Munde
वंजारा-बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या
दरम्यान, बीडमध्ये आयोजित बंजारा समाजाच्या आंदोलन मोर्चात धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असतान त्यांनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचे म्हटले. त्यावेळी, मोर्चातील काही तरुणांनी याला जोरदार विरोध केला. या तरुणांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. बंजारा आणि वंजारा एक नाही, असे हे तरुण म्हणत आहेत. या आधी तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा-बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणीही बंजारा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी करत केली.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
बीड येथील बंजारा समाजाच्या मोर्चात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळे आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावे. तसेच बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App