अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करणार आहेत.Devendra Fadnavis will lead the BJP’s march on March 9 to demand the resignation of Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई – अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करणार आहेत.
आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिकांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले.
विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा असा काही प्रकार इतिहासात पहिल्यांगदाच घडत असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इतिहासात असं कधीही घडलं नाही. राज्याचे एक मंत्री दाऊदसोबत व्यवहार केल्याचा, हसीना पारकरला पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्या स्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून हसीना पारकरला पैसे देऊन हे काम झालं आहे. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. असं असताना एखादा मंत्री मंत्रीपदावर राहातो, हे नैतिकतेला धरून नाही”.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App