फडणवीसच म्हणाले, माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह नाही; मग ते अजून मंत्रिमंडळात का ठेवलेत??

मुंबई : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहिलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह नाही, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण असे भूषणावह नसलेले मंत्री मंत्रिमंडळात अजून का बसलेत आणि ते तिथे काय करताहेत??, हा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. पण म्हणून हा सवाल बिगर महत्त्वाचा ठरत नाही.

माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओ प्रकरणाने वेगवेगळी वळणे घेतली त्यामध्ये पवार संस्कार त्यांनी एकमेकांवर राजकीय सूड उगवण्यापासून थेट मारहाणी पर्यंत हे प्रकरण पोहोचले पण या सगळ्यामध्ये फडणवीस सरकारची बदनामी झाली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही कठोर कारवाई केली नाही.

आपण रमी खेळत नव्हतो तर ती स्किप करत होतो असा खुलासा माणिकराव कोकाटे यांनी करून पाहिला. परंतु तो खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमान्य केला. तटकरे यांच्या या वक्तव्यातून माणिकराव कोकाटे यांनी सूचक धडा घेतला नाही त्यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. कारण अजित पवारांनी त्यांना अजून तसे सांगितले नाही. त्या उलट अजित पवारांनी मारामारी करणाऱ्या सुरज चव्हाणचा राजीनामा घेतला. त्यामुळे मोठा मासा वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी घेतला अशी टीका फडणवीस सरकारला सहन करावी लागली.

त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकरावांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ भूषणावह असल्याची परखड टीका केली. त्यांचा खुलासा देखील त्यांनी अमान्यच केला. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणार की नाही??, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार की नाही??, याविषयी मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले.

फडणवीसांची आक्रमकता कुठे गेली?

नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यांना महायुतीत स्थान मिळणार नाही असे फडणवीस यांनी अजित पवारांना थेट पत्र लिहून कळविले होते. अजित पवारांना फडणवीस यांचा दबाव सहन करावा लागला होता नवाब मलिकांना महायुतीतून बाहेर ठेवावे लागले. अर्थात नवाब मलिकांचे प्रकरण देशद्रोही दाऊद इब्राहिमशी संबंधांचे होते. माणिकराव कोकाटे हे प्रकरण तसे नाही. पण म्हणून कोकाटे प्रकरणात फडणवीस सरकारची बदनामी पैसे राहिले नाही. म्हणूनच फडणवीसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. “करने को पवार संस्कारित; भरने को भाजपा” अशी आत्ताची अवस्था येऊन ठेपली आहे. त्यातून फडणवीस यांनी भाजपला लवकरात लवकर बाहेर काढण्याची राजकीय गरज निर्माण झाली आहे.

Devendra fadnavis targets Manik Rao koKate, but didn’t take firm action

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात