विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यांचे पक्ष जर केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असते, तर लोकशाही अधिक बळकट झाली असती अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला हाणला.
लोकमत वृत्त समूहातर्फे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत फडणवीस यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. देशाच्या राजकारणामध्ये फार मोठे बदल घडताय त्याविषयी तुमचे मत काय??, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकं आता “डिसाईसिव्ह मेंडेट” देत आहेत. त्यांना आता केंद्रात प्रबळ सरकार हवे आहे 1990 च्या दशकात केंद्रातला मुख्य पक्ष दुबळा असायचा त्यामुळे आघाडी सरकारे चालवताना अडचणी यायच्या.
आता तशी स्थिती केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे नाही पण लोकशाही प्रकल्भ होण्याच्या दृष्टीने विरोधी पक्ष देखील जबाबदार असला पाहिजे मतभेद असले तरी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे आणि टोकाला जाऊन विरोध करणे असला प्रकार असता कामा नये टोकाचा विरोध करताना आपण राष्ट्रद्रोही शक्तींच्या हातातले बाहुले बनत चाललोय काय??, याचाही विरोधी पक्षांनी विचार केला पाहिजे. केंद्रात जर शरद पवार आणि जयंत पाटील यांचा पक्ष मुख्य विरोधी पक्ष असता तर लोकशाही अधिक बळकट झाली असती, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला हाणला.
– एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर तिखट प्रहार
काही पर्मनंट दुसरे अलटून-पालटून उपमुख्यमंत्री असा सरकारमध्ये प्रकार आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून रुळलेत का??, असा सवाल जयंत पाटलांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही अजितदादांच्या दिशेने बाण सोडला आहे हे लक्षात आले. पण ते मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे आणि मी यांच्यात पदाची स्पर्धा नाही. आम्ही दोघेही ज्या पदावर बसतो त्या पदाला न्याय देण्यासाठीच काम करतो. एकनाथ शिंदे हे तर तुमच्यावर किती तिखट प्रहार करतात विधानसभेत ते किती आक्रमकपणे बोलतात तुम्हाला लगेच गप्प करतात हे तुम्ही अनुभवता, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यावर तुम्हाला जे बोलता येत नाही ते तुम्ही त्यांच्याकडून बोलून घेता असा चिमटा जयंत पाटलांनी काढला त्यावर देवेंद्र फडणवीस लगेच उद्गारले, यालाच तर राजकारण म्हणतात ना!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App