मुंबई म्हणजे तुम्ही नाही, असे ठाकरेंना म्हणणारे फडणवीस पश्चिम महाराष्ट्र सोडा, पुणे जिल्हा म्हणजे सुद्धा तुम्ही नाही; असे पवारांना केव्हा म्हणणार??

नाशिक : मुंबई म्हणजे तुम्ही नाही, मराठी म्हणजे तुम्ही नाही, असे ठाकरेंना म्हणणारे फडणवीस पश्चिम महाराष्ट्र सोडा, पुणे जिल्हा म्हणजे सुद्धा तुम्ही नाही, असे पवारांना म्हणतील का??, असा सवाल महापालिका निवडणुका संपताना आणि जिल्हा परिषद निवडणुका सुरू होताना समोर आलाय. Devendra fadnavis

– ठाकरे बंधू खरा टार्गेटवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि ठाण्यातला प्रचार ठाकरे बंधूंवर केंद्रित केला होता. त्यामध्ये त्यांनी कायम मुंबई म्हणजे तुम्ही नाही. मराठी म्हणजे तुम्ही नाही. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, तर हे सगळे महाराष्ट्राची जनता आहे. महाराष्ट्राची जनता इथली मालक आहे. तुम्ही मालक नाही. तुम्ही फक्त ठाकरे आहात, या मुद्द्यावर भर देणारी भाषणे केली. यातून फडणवीसांनी ठाकरे नावाच्या तथाकथित ब्रँडमध्ये पाचर मारली. फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई तयार केली. त्यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र येणे भाग पाडले. मुंबईत ठाकरे बंधूंना “कॉर्नर” करण्यात फडणवीस यशस्वी झाले. पण त्यांनी ठाकरे बंधूंच्या विरोधात खरी लढाई केली. त्यासाठी भाजपची प्रचंड मोठी फौज मोठ्या रसद पुरवठ्यासह कामाला लावली.

पुणे, पिंपरी अजितदादांनी काढला फणा

पण त्याच वेळी फडणवीसांनी अजितदादांना सत्तेच्या वळचणीला बसवून ठेवण्याचा काही अंशी फायदा दिला. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांनी फणा काढताच फडणवीसांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे यांना “बळ” दिले त्यांच्या पाठीशी चंद्रकांतदादांना उभे केले. महापालिका निवडणुकांच्या दरम्यान फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला किमान चार – चार वेळा भेटी दिल्या. महापालिका निवडणुकांच्या समारोपाची सभा देखील फडणवीस यांनी पुण्यातल्या गोखले नगरमध्ये घेतली.



हे सगळे करताना फडणवीसांना राज्य सरकारच्या पातळीवर थोडी तारेवरची कसरत करावी लागली. ज्या पद्धतीने फडणवीसांनी ठाकरे बंधूंना अंगावर घेतले, त्या पद्धतीने फडणवीस यांनी अजितदादांना अंगावर घेतले नाही, तर आपल्या भाजप मधल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना अजितदादांना अंगावर घ्यायला लावले. किंबहुना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या भाजपच्या नेत्यांना त्यांनी अजितदादांच्या अंगावर घातले. पण हे करताना सुद्धा फडणवीस यांनी अजितदादा किंवा शरद पवारांना तुम्ही म्हणजे पुणे जिल्हा नाही. तुम्ही म्हणजे पुणे महापालिका किंवा पिंपरी महापालिका नाही, असे म्हटले नाही. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये नुरा कुस्ती आहे, असा प्रवाद तयार झाला. त्या प्रवादाला फडणवीसांनी उत्तर दिले नाही.

– पुणे जिल्हा परिषदेत पवार उरतील का??

त्या पलीकडे जाऊन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये फडणवीस अजितदादा किंवा शरद पवारांना घेरताना तुम्ही म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तर सोडाच, पण पुणे जिल्हा सुद्धा नाही, असे म्हणणार का??, असा सवाल समोर आलाय. यातले वेगळे राजकीय “रहस्य” चंद्रकांतदादा पाटलांनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून पुढे आणले. पवार फॅक्टरचे आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, नगरपरिषदा आणि महापालिकांमध्ये होते. त्या अस्तित्वाला भाजपने 2017 नंतर सुरुंग लावला. भाजपने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा जिल्हा परिषदा जिंकल्या. कोल्हापूर सोलापूर, सांगली, महापालिकांमध्ये भाजपचे महापौर बसविले. भाजपने या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीची सुमडीत कोंबडी कापली.

राहता राहिला पुणे जिल्हा. आता पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फडणवीस आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना उतरवून पुणे जिल्हा म्हणजे सुद्धा तुम्ही नाही, असे दाखवून देणार का??, तसे प्रत्यक्षात म्हणणार का?? की आणखी काही वेगळी खेळी करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये अजितदादांनी भाजपवर टीका करून फणा काढला. तो फणा वेळीच ठेचणे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत अजितदादांचा फणा फडणवीस ठेचतील का??, हा भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रश्न भेडसावतो आहे.

Devendra fadnavis targeted Thackeray brothers, he must target Pawar now

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात