नाशिक : पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी हमीपत्र जारी करून जो “गेमचेंजर’ डाव टाकला, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचर मारली. अजितदादांच्या मेट्रोच्या फुकट प्रवासाची पुरती पोलखोल केली. त्यामुळे अजितदादांचा तथाकथित “गेमचेंजर” डाव मतदानापूर्वीच उधळला गेला.
– अजितदादांची घोषणा
अजितदादांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी हमीपत्र जारी केले. त्यात भरमसाठ आश्वासने दिली. अजितदादांच्या आश्वासनांना सुप्रिया सुळे यांनी हमी भरली. पण या हमीपत्रातून अजितदादांनी सगळ्यात मोठी घोषणा केली, ती म्हणजे पुणेकरांना मी मोफत बस प्रवास आणि मोफत मेट्रो प्रवास देईन, ही होती. अजितदादांची ही घोषणा पुणेकरांना आकर्षक वाटण्यापूर्वीच मराठी माध्यमांना फार आकर्षक वाटली त्यामुळे अजितदादांनी पुण्यातली निवडणूक फिरवली. फार मोठी गेमचेंजर चेंजर गेम टाकली, अशा बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी केली. आता फक्त मतदान व्हायचाच अवकाश आहे, अजितदादांनी ही निवडणूक जिंकली आहे अशी वातावरण निर्मिती यातून झाली.
– मोफत प्रवासाचा फोडला फुगा
पण प्रत्यक्षात अजितदादांच्या या तथाकथित गेमचेंजर डावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी पोलखोल केली. जे होणे शक्य नाही ते अजितदादांनी आश्वासन दिले कारण त्यांना पराभवाची भीती वाटली, अशा परखड शब्दांमध्ये फडणवीसांनी मोफत मेट्रोचा फुगा फोडला.
– मोफत मेट्रो का नाही शक्य??
कुणाच्याही मनात आले म्हणून मेट्रोचा प्रवास मोफत होणार नाही कारण मेट्रो ही महामेट्रो कंपनी द्वारे चालवली जाते. तिच्यावर महापालिकेची सत्ता किंवा हक्क चालत नाही केंद्र आणि राज्य सरकारची ती कंपनी आहे. मेट्रोचे दर कायद्यानुसार कंपनी ठरवत असते तिच्यात महापालिकेचा कुठलाही सहभाग नसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुणेकरांना मोफत काही नको. कारण ते रांगा लावून टॅक्स भरणारे लोक आहेत. त्यांना फक्त सुखकर प्रवास आणि माफक दर एवढे हवे आहे त्यामुळे तेवढेच दिले पाहिजे. उगाच पुण्यातून उडणाऱ्या महिलांना फुकट विमान प्रवास अशा घोषणा करण्यात काही मतलब नाही. तशा घोषणा करायला आपल्या बापाचे काही जात नाही, असा टोला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना हाणला. अजितदादांच्या तथाकथित “गेमचेंजर” डावात दुसऱ्याच दिवशी पाचर मारली. त्यामुळे अजितदादांच्या फार मोठ्या कंपन्यांच्या सल्ल्याची वासलात लागली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App