विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला. एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाच पाहिले नाहीत. कोणत्या मुद्यावर कुठे जावे हे ही या लोकांना माहिती नाही, असे ते विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचाही समाचार घेतला.Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस सोलापुरात आयोजित एका समारंभात बोलताना म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या वेळीदेखील काही लोक राजकारण करतात. काही लोकांच्या डोक्यात इतका किडा गेला आहे की, सोलापुरातील एका नेतृत्वाने म्हटले की सोलापुरात हा जो पाऊस झाला तो निसर्गाने नाही तर राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला त्यांना एक फूल द्या, कधी कधी मानसिक परिणाम होतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.Devendra Fadnavis
सीएम फडणवीस म्हणाले की, इतके गोंधळलेले विरोधक मी माझ्या जीवनात कधीही बघितलेले नाही. इतके मोठे-मोठे लोकं त्यांना कोणत्या मुद्द्यावर कुणाकडे गेले पाहिजे, कायदा काय आहे ह्या गोष्टी माहिती आहे का नाही हे मला माहिती नाही. पण त्यांना सर्व माहिती असेल आणि केवळ वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत आपला पराभव झाला तर त्यासाठी कारण शोधण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे.
फेक नरेटीव्ह करण्याचा प्रयत्न
सीएम फडणवीस म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे काहीच चोकलिंगम यांच्याकडे नाही. यासाठी वेगळा कायदा आहे. त्याचे संपूर्ण काम दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. त्यावर संपूर्ण कंट्रोल हा वाघमारेंकडे देण्यात आला आहे. काल हे सर्व महाभाग चोकलिंगम यांना भेटले. मग त्यांना कळाले की आपण वाघमारेंना भेटायला हवे होते. मग काही तरी थातूर मातूर सांगितले. हे वाघमारेंना बोलवणार आहेत त्यांना वाघमारेंना बोलावण्याचा अधिकार नाही. वाघमारेंना भेटून काय मागणी करावी हे त्यांना समजले नाही. राज्य निवडणूक आयोग हे राज्यातील सर्व निवडणूक घेत असते. वोटर लिस्टच्या संदर्भात ते आक्षेप घेण्यासाठी वेळ देत असतात. पण कायदा समजून घ्यायचा नाही आणि फेक नरेटीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे.
मविआचा संविधानावर विश्वास नाही
सीएम फडणवीस म्हणाले की, मतदार यादीमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आमचा कशाला नकार नाही. काही ठिकाणी बोगस नावे आहेत ही जुनीच आहे. आम्ही त्यावर आक्षेप घेतला आहे. तुम्ही सत्तेत असतानाही तेच होते. मला असे वाटते पराभव स्वीकारावा, जनतेते जावे पुन्हा निवडणूक लढवावी. पण याचा कुणाचा भारतील संविधानावर विश्वास नाही. संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही. केवळ फेक नरेटीव्ह तयार करण्याचे काम करत आहेत. यांच्यामध्ये शरद पवारांना समजते काल त्यांच्या हे लक्षात आले आणि ते आज यांच्यासोबत गेले नाही.
जनता आमच्या पाठीशी
सीएम फडणवीस म्हणाले की, कुणाला कुठेही जाता येईल. कुणी कोणासोबतही गेले तरी महायुतीचे निवडून येणार, ती भक्कम आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. मग आम्ही विजयी झाल्यावर ते आताचे फोटो दाखवून रडणार आहेत की बघा आम्ही म्हंटलो होतो मतदार याद्यांमध्ये घोळ आहे म्हणून. त्यांना रडण्याची सवय आहे ती काही इतक्या लवकर संपणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App