विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.Devendra Fadnavis
मनोज जरांगे यांनी मुंबईला निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि एकनाथ शिंदे यांना काही बोलू देत नाहीत, असा आरोपही जरांगे यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली.Devendra Fadnavis
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
ओबीसीमध्ये जवळपास 350 जाती आहेत. मेडिकलच्या प्रवेशाचे बघितल्यास ओबीसीचा कटऑफ एसीबीसीच्या वर आहे. एसीबीसीच्या कटऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्यामुळे आताच्या मागणीने किती भले होणार, याची मला कल्पना नाही. आकडेवारी नीट पाहिल्यास मराठा समाजाच्या हिताचे काय आहे, ते आपल्या लक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
समाजाच्या नेत्यांनी विचार करून मागणी करावी
मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून मागणी केली पाहिजे, ही जबाबदारी मराठा समाजाच्या नेत्यांची आहे. एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएसची मागणी असेल, तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षणाचा हेतू असेल, तर वेगळी गोष्ट आहे. पण तो हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, तर मागणीचा योग्यप्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगेंचे आंदोलन आमच्यासाठी राजकीय नाही
मनोज जरांगेंचे आंदोलन कुठेतरी राजकीय होत चाललंय हा प्रश्न आता दिसतोय. यापूर्वी काय झाले? हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्यासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही त्याला सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी आणि शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी निर्णय घेतले
मराठा समाजासाठीचे निर्णय मी मुख्यमंत्री आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ 15 वर्ष हा स्थापन झाले नाही? 15 वर्षे कुणाची सत्ता होती? असा सवाल करत, मी ते उभे केल्याचे फडणवीसांनी सांगितले. आज दीड लाख उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केलेत. आज सारथीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होत आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी तयार होत आहेत. स्पर्धापरिक्षांमध्ये विद्याथी टिकत आहे.
मविआ सरकारने मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय दाखवावा
मराठा समाजासाठी शिक्षणाच्या योजना, वसतीगृहाच्या योजना, वसतीगृह होईपर्यंत भत्त्याच्या योजना सगळे आम्ही केलेले आहे. त्यामुळे काही लोक तोंड वर विचारतात, त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले? ते सांगावे. अडीच वर्ष जे सरकार होते, त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App