विशेष प्रतिनिधी
नागपूर : राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. राहुल गांधी ईश्वराने भाजपला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, यासाठी आपल्याला भाग्य घेऊन यावे लागते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. Devendra Fadnavis said- Rahul Gandhi is God’s boon to BJP, we don’t need to worry as long as it is there!
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली. पक्ष, संघटना याचे महत्त्व संपले. काँग्रेसचा नेता मोठा झाला, पण कार्यकर्ता राहिला नाही. देशातील सर्वात जुन्या पक्षात आज ज्या प्रकारची अवस्था दिसते, त्यानुसार हा पक्ष वर येणे कठीण आहे. भाजपमध्ये मात्र असे होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
🕛 11.50am | 16-12-2023 📍 Koradi, Nagpur | स. ११.५० वा | १६-१२-२०२३ 📍कोराडी, नागपूर LIVE | भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक.@BJP4Maharashtra @cbawankule#Nagpur #Maharashtra #BJP #BJPMaharashtra https://t.co/4uemLMBqXI — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 16, 2023
🕛 11.50am | 16-12-2023 📍 Koradi, Nagpur | स. ११.५० वा | १६-१२-२०२३ 📍कोराडी, नागपूर
LIVE | भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक.@BJP4Maharashtra @cbawankule#Nagpur #Maharashtra #BJP #BJPMaharashtra https://t.co/4uemLMBqXI
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 16, 2023
हे केवळ भाजपमध्ये शक्य
देवेंद्र फडणवीस तीन राज्यातील नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना म्हणाले की, काँग्रेसमध्ये मात्र असे होत नाही. तिथे ज्या नेत्याला बदलले जाते, तो पक्षाचीच कबर खोदतो. हे फक्त भाजपमध्येच शक्य होते. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च पद होते, त्याला सांगितले की, तुला आता दुसरे काम दिले जाईल, त्यावर तो नेता हसत हसत नवी जबाबदारी स्वीकारतो, हे केवळ आपल्या पक्षात होते असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट होऊ देऊ नका. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही भाजपाची भूमिका आहे. आपल्या आरक्षणाचे काय होणार अशी मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची भावना असणे यात गैर काही नाही. पण त्यावरून विभाजनाचे लोण कार्यकर्त्यांत पसरू देऊ नका असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे प्रदेश पदाधिकारी मेळाव्यात बोलताना केले. भाजपासाठी कुठलाही समाज मतपेढी नाही. निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. मुळात हे निवडणुकीचे मुद्देच नाही. राज्याच्या सामाजिक चौकटीला तडे जाता नये असे आवाहन फडणवीस यांनी केले.
शरद पवारांनी मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. शरद पवारांना मंडल आयोगावेळीच मराठा समाजाला आरक्षण देता आले असते, पण त्यांनी स्वतःच्या नेतेपदासाठी मुद्दाम 2 समाजांना झुंजवत ठेवले, असे ते म्हणाले. ते नागपुरात भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App