अटल सेतू वर भेगा, पाणीपट्टीत वाढ काँग्रेसने पसरवली फेक न्यूज; फडणवीसांनी केली पोलखोल!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अटल सेतूवर पहिल्याच पावसामुळे भेगा पडल्या, खड्डे पडले, अशी फेक न्यूज काल पसरली. मराठी माध्यमांनी त्याचे वेगवेगळ्या अँगलने फुटेज दाखविले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तिथे पोहोचले. त्यांनी अटल सेतू वर पहिल्याच पावसात कसे खड्डे पडले, याचे वर्णन करून सांगितले. परंतु ती प्रत्यक्षात फेक न्यूज ठरली. कारण जे फुटेज दाखवले ते अटल सेतूचे नसून ते तात्पुरत्या बांधलेल्या सर्विस रोडचे होते. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साइटवर जाऊन च्या संदर्भात खुलासा केला. Devendra Fadnavis said in a social media post

त्यापाठोपाठ आज पाणीपट्टीत वाढ केल्याची बातमी पसरवली गेली. प्रत्यक्षात सरकारने अशा कोणताही निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सविस्तर पोस्ट लिहून काँग्रेसच्या खोट्या नॅरेटिव्हची आणि फेक न्यूजची पोलखोल केली.

सोशल मीडिया पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटले :

काल अटलसेतू आणि आज पाणीपट्टी ! फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच…!!

काँग्रेसने आता बातमी पसरविली की, आताच्या सरकारने पाणीपट्टीत 10 पट वाढ केली. पण, खरोखर ही वाढ केली कुणी?? 29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली. ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता तेच आमच्यावर आरोप करतात. 2018 मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते. मात्र 2022 मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता, प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले. त्यामुळे 500 ची वाढ 5000 रुपये झाली.

हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे आणि शेतकर्‍यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यातच त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल.

माझी माध्यमांनाही विनंती आहे की, निवडणुकीत विरोधक फेक नॅरेटिव्हसाठी बातम्या देत राहतील. पण, त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे. आता राज्यातील जनतेनेच ठरवावे, सुलतानी सरकार कोणते होते??

Devendra Fadnavis said in a social media post

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात