तुकोबारायांची ओवी सांगत देवेंद्र फडणवीसांकडून अमृतकाळातील राज्याचा पहिला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प सादर

जाणून घ्या फडणवीसांनी कशी केली आपल्या पहिल्या अर्थसंकल्पाची सुरुवात आणि अर्थसंकल्प आधारित असलेली पाच ध्येय कोणती?

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा होत्या. पाच ध्येयांवर आधारित असणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याचे दिसून आले. हा अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी कशाप्रकारे सुरुवात केली हे पाहूयात. Devendra Fadnavis presents the state first Panchamrit budget in Amritkaal

देवेंद फडणवीस म्हणाले, ‘’आज जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठगमनाचा दिवस अर्थात तुकारामबीज, मी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी सांष्टांग दंडवत घालतो आणि त्यांनी जो संदेश दिला आहे, ‘’टिकवावे धनं ज्याची आस करी जनं’’ या तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडतोय. काल जागतिक महिलादिन झाला आणि उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन, भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. संत निवृत्तीनाथांचे ७५०वे जयंती वर्ष सुरू आहे, ज्यांनी भारताला केवळ संविधनाच दिले नाही तर अर्थकारणावर सुद्धा मार्गदर्शन केले, त्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या पुस्तकाचे शताब्दी वर्ष सुद्धा आहे. कितीतरी योग जुळून आलेत, त्यातच अर्थमंत्री म्हणून माझा आणि महाराष्ट्राच्या अमृतकाळातील सुद्धा हा पहिला सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर सादर करताना मला अत्यानंद होतो आहे.’’


‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!


याशिवाय ‘’हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्यभिषकाचे हे ३५०वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासनाची पुढील वाटचाल असेल. २ ते ९ जून २०२३ या कालावधीत शिवराज्यभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी ३५० कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आंबेगाव तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यासाठी ५० कोटी रुपये देण्यात येत आहे. याच धर्तीवर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसीत करण्यात येतील. या उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शीत करण्यात येईल आणि यासाठी २५० कोटी निधी देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल.’’ असंही जाहीर केलं आहे.

याचबरोबर ‘’भारत विकसित राष्ट्र व्हावे हा पंतप्रधान मोदींचा निर्धार असून, त्या दृष्टीने २०२७ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान पाच ट्रिलिय व्हावे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यात एक ट्रिलियनचा वाटा महाराष्ट्राचा असावा, असा आमचा संकल्प आहे. यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करून, त्यात उद्य़ोग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या जलद आणि सर्वसमावेशी विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्र’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी ३६ हजार कोटींहून अधिकची तरतूद झाली. मी पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने मनपूर्वक आभार मानतो.’’ असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

तर अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच धेय्यांवर आधारित असून, पंचामृत असा आहे, असं म्हणत फडणवीसांनी ते पंचामृत कोणते हे पुढीलप्रमाणे सांगितले.

पहिले अमृत – श्वासत शेती, समृद्ध शेतकरी.

दुसरे अमृत- महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास

तिसरं अमृत – भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

चौथे अमृत – रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

पाचवे अमृत – पर्यावरणपुरक विकास

Devendra Fadnavis presents the state first Panchamrit budget in Amritkaal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात