नाशिक : फडणवीस – शिंदे – फडणवीस असे आलटून पालटून मुख्यमंत्री; पवार काका पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!!, हा प्रकार आज कोल्हापूरमध्ये घडला. Devendra fadnavis
पुढारीचे सर्वेसर्वा बाळासाहेब जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. एलन मस्क यांच्या कंपनीबरोबर करार करायचा असल्यामुळे कोल्हापुरातून लवकर मुंबईला जावे लागेल म्हणून मी पहिल्यांदा भाषण करतोय. माझ्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंतर भाषण करतील, तसेही आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री होत असतो. एकनाथ शिंदे यांच्या हातात मुख्यमंत्री पद सोपवले की ते safe असते. ते मुख्यमंत्रीपद सांभाळतात आणि आपल्याला परत देतात. त्यांना मुख्यमंत्री केले, तरी आपल्याला परत मुख्यमंत्री होता येते, हे हे मला माहिती झाले आहे. त्यामुळे माझ्या नंतर ते भाषण करतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या समोर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे फडणवीस यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले.
– पवारांची महत्त्वाकांक्षा फोल
शरद पवारांना स्वतः सोडून राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला कधी मुख्यमंत्री करता आले नाही. अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा अजून तरी पूर्ण झालेली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांना नेहमीच पोस्टरवर भावी मुख्यमंत्री म्हणून बसविले, पण राजकीय कर्तृत्वाच्या अभावी त्यांना ते पद कधीच मिळू शकले नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे यांचे नाव महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून अनेकदा समोर आले. परंतु, त्यांच्या नावाला महाराष्ट्रातून कधीच प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादीच्या बाकीच्या नेत्यांनी त्यांचे नाव कधी फारसे उचलून धरले नाही.
– पवार नेहमीच अविश्वासार्ह
या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आलटून पालटून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. परंतु, त्यांच्या फारशी राजकीय कटूता कधी आली नाही. नेमका याचाच उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी पवार काका – पुतण्यांसमोर सूचक पद्धतीने करून त्यांना राजकीय दृष्ट्या डिवचले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर ते safe असते, असे सांगून बाकी कुणाला म्हणजे अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नाही हे अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभर रंगली. त्याचबरोबर पवार काका – पुतण्यांसमोर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेची स्तुती केल्यामुळे पवारांकडे तशी विश्वासार्हता नाही, ही बाब सुद्धा सगळ्यांसमोर सूचक पद्धतीने आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App