विशेष प्रतिनिधी
परभणी : Devendra Fadnavis आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विधान फडणवीसांनी केले आहे.Devendra Fadnavis
सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहित आहे ज्या वेळेस प्रचंड मोठे बहुमत या भाजपला मिळाले, तर लोक म्हणायला लागले की आता हे लखपती दीदी योजना बंद करणार. पण लक्षात ठेवा योजना बंद झालेली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचे नाही, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे.Devendra Fadnavis
महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी झाल्या
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी झाल्या. मेघना दीदींनी एक लाख लखपती दीदी या परभणीतून केल्या आहेत. आता या वर्षी आपण एक कोटीपर्यंत पोहोचणार आहोत. आपला महापौर जेव्हा या महापालिकेवर बसेल, त्याच्या बरोबर एक वर्षानंतर मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पहिला आढावा मी हा घेणार की तुम्ही माझ्या किती लाडक्या बहिणींना लखपती केले.
विकासाच्या आड येणाऱ्याला नेस्तनाबूत करायचे
या परभणीच्या विकासाच्या जो आड येईल, त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रभावतीच्या या नगरीत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता किती वर्ष आपण इतिहासात सांगणार आहोत? आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे. इतिहासात जगणारे, इतिहासातच मारून जातात. इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App