पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून बाहेर पडून पक्षासाठी काम करण्याची फडणवीसांची ऑफर!!

Devendra fadnavis offers to resign as dy. CM and to work for the party

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही, पण एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे केंद्रात एनडीए आघाडीचे सरकार बनवणार असले तरी महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची आणि पक्षाचे काम करण्याची ऑफर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिली. सरकारमधून मोकळे होऊन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम करण्याची तयारी फडणवीस यांनी दाखवली. Devendra fadnavis offers to resign as dy. CM and to work for the party

लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भाजपची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी पराभवासंदर्भात विचारमंथन केले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपच्या पराभवाची कारणे सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो अपप्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले :

मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो.

शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाले. त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली, महायुती 2 कोटी 48 लाख म्हणजे मते मिळाली. म्हणजे फक्त 2 लाख मते कमी मिळाली.

मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मते मिळाली. महायुतीला २६ लाख म्हणजे 2 लाख मते जास्त मिळाली आहेत. तरीही महायुतीच्या 4 जागा गेल्या. राज्यातील 8 जागांवर 4 % मतांचा फरक राहिला. तसेच 6 जागांवर 30000 मते कमी मिळाली.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 27.84 % मते होती. त्यावर 23 जागा होती. यावेळी 26.17 % मिळाली. आता केवळ 9 जागा मिळाल्या. काँग्रेसला 2019 मध्ये 16.41 %१६.४१ मते मिळाली होती त्यावेळी काँग्रेसला फक्त 1 एक जागा मिळाली होती. आता 17 % मते मिळून त्यांच्या जागा 13 झाल्या.

Devendra fadnavis offers to resign as dy. CM and to work for the party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात