फडणवीस यांच्या राजीनाम्याचा ऑफरचा महायुतीत झटका सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी समोर आले भाजपचे नेते + मुख्यमंत्री!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तारूढ होणार आहे, पण ते भाजपच्या पूर्ण बहुमताचे नसेल, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अर्थात एनडीएच्या पूर्ण बहुमताचे असेल. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला फटका बसला. त्याचा परिणाम म्हणून भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. Devendra fadnavis offers resignation, tremors in mahayuti

त्यातल्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची ऑफर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिली. महाराष्ट्राच्या सरकारमधून बाहेर पडून महाराष्ट्रात भाजपसाठी पूर्णवेळ काम करण्याची ही ऑफर होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारल्याचा झटका महायुतीतल्या घटक पक्षांना बसला. आत्तापर्यंत पराभवाची जबाबदारी या विषयावर न बोलणारे नेते धडाधड त्यावर बोलू लागले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत. तिथे फडणवीसांच्या राजीनाम्याच्या ऑफरची बातमी धडकताच त्यांनी महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी कोणा एका नेत्याची नसून सामूहिक जबाबदारी असल्याचे वक्तव्य केले. महायुतीतले सगळे घटक पक्ष एकदिलाने निवडणूक लढले. महायुतीला मिळालेली मते लक्षात घेता आणखी जागा मिळणे अपेक्षित होते, पण तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे पराभवाची जबाबदारी कोणा एका नेत्याची नव्हे तर सामूहिक जबाबदारी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील दिल्लीत पोहोचले. त्यांनी देखील काही विशिष्ट परिस्थितीमुळे महायुतीला पराभवाचा झटका बसल्याचे सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण हे देखील होते. उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची ऑफर ही देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक ऑफर आहे. कोअर कमिटी मध्ये त्याविषयी चर्चा देखील झाली नाही. भाजपला खासदार संख्येचा महाराष्ट्रात फटका बसला. परंतु मतांमध्ये कुठली कमतरता नव्हती, याची ग्वाही अशोक चव्हाण यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनामाचे ऑफर दही पर्यंत बाकी कुठलेच नेते पराभवाच्या जबाबदारीवर एवढे ठोस बोलले नव्हते, ते फडणवीस यांच्या राजीनामाच्या ऑफर नंतर धडाधड बोलू लागले. फडणवीसांच्या “त्या” ऑफरचा महायुतीतच पहिला झटका बसला..

Devendra fadnavis offers resignation, tremors in mahayuti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात