विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर केंद्रीय भाजप नेतृत्वाने राजस्थान, मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड यांच्यासारखे कुठलेही सरप्राईज न देता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी नेमले. भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. Devendra fadnavis new CM for Maharashtra
केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांच्याच नावावर एकमत झाले.
Breaking News 🗞️ भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या समस्त आमदारांच्या बैठकीआधी प्रदेश भाजप कोअर कमिटीची बैठक केंद्रीय निरीक्षक निर्मला सितारामन आणि विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत सुरू…#BJP_CM #Maharashtra pic.twitter.com/zL5NgtyUsN — Ashish Jadhao (@ashish_jadhao) December 4, 2024
Breaking News 🗞️
भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या समस्त आमदारांच्या बैठकीआधी प्रदेश भाजप कोअर कमिटीची बैठक केंद्रीय निरीक्षक निर्मला सितारामन आणि विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत सुरू…#BJP_CM #Maharashtra pic.twitter.com/zL5NgtyUsN
— Ashish Jadhao (@ashish_jadhao) December 4, 2024
राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या राज्यांमधल्या निवडणुका जिंकल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तिथे मुख्यमंत्री बदलून सरप्राईज नावे समोर आणली होती. त्यानुसार राजस्थानात भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशात मोहन यादव आणि छत्तीसगड मध्ये विष्णु देव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.
पण महाराष्ट्रामध्ये तसे काहीही घडले नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुका महायुतीने जरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या होत्या तरी भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडेच होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर स्ट्रॅटजी आखून महायुतीचा विजय साकार केला. लोकसभा निवडणुकीत बसलेला धक्का पचवून विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवणे अवघड होते, पण फडणवीसांनी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शांतपणे स्ट्रॅटेजी आखून महाराष्ट्रातला विजय साकार केला यामध्ये संघाच्या “सजग रहो” आंदोलनाचा सिंहाचा वाटा राहिला. संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा आग्रह धरला. तो फलद्रूप ठरला. फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App