नाशिक : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या आणि भाजपने सत्तेबाहेर ठेवलेल्या पवार संस्कारितांची थांबेना दादागिरी; फडणवीस, लवकर साधा सफाईची संधी!!, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे आली. Devendra fadnavis
भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचणीला घेतले. त्यांच्या राष्ट्रवादीतल्या 9 नेत्यांना मंत्री केले. हे सरकार भाजप महायुतीचे असल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वर्तणुकीत फरक पडेल, दादागिरी कमी होऊन थोडा मावळपणा येईल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात भाजपच्या सत्तेच्या वळचणीची झिंग अजितदादांच्या राष्ट्रवादीला जास्त चढली. त्यातूनच धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे वगैरे मंत्र्यांची मुजोरी वाढली. मूळात जिथे पवार नावाचे “पॉलिटिकल एलिमेंट” गेले, तिथे त्यांनी विरोधकांच्या पेक्षा मित्र पक्षांनाच त्रास दिला, हा अनुभव काँग्रेसला आधी आला. आता तो भाजपला येतोय. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकार मधल्या मंत्र्यांसारखे दादागिरीनेच वागत आहेत. त्यांना भाजपने अजून चाप लावलेला दिसत नाही.
जितेंद्र आव्हाड, रोहित पवार या नेत्यांना भाजपने सत्तेच्या वळचणीला अजून घेतले नाही. तरी त्यांची दादागिरी थांबली नाही. विधानमंडळातल्या मारामारी प्रकरणात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खेद व्यक्त करायला सांगितल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरळपणे खेद व्यक्त केला. पण “पवार संस्कारित” आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरळपणे खेद व्यक्त केला नाही उलट ते आपल्या कार्यकर्त्याची नसती मखलाशी करत राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करून बाहेर लोक आपल्या सगळ्यांना शिव्या घालताय सगळे आमदार माजलेत, असे बोलावे लागले. तरी “पवार संस्कारित” नेते सुधारले नाहीत.
विधिमंडळातल्या मारामारी प्रकरणातच आमदार रोहित पवारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारामारी केली त्यांच्याविरुद्ध फक्त “एफआयआर” दाखल झाला.
माणिकराव कोकाटे यांच्या जंगली रम्मी प्रकरणात प्रकरणात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सत्तेचा माज दिसायचा तो दिसलाच. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ते नुसते मारहाण करून थांबले नाहीत. तर त्यांनी जाहीरपणे त्या मारहाणीचे समर्थन केले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पण या सगळ्या प्रकारचे पडसाद नांदेड मध्ये टायर जाळून आंदोलन पेटण्यात झाले.
– कायद्याचा बडगा दाखवाच
पण केवळ नाराजी व्यक्त करून किंवा कुठले गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीवाले “पवार संस्कारित” नेते वठणीवर येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना गोड बोलणारे संघ संस्कारही उपयोगी ठरणार नाहीत, तर खऱ्या अर्थाने कायद्याचा बडगा चालवून “पवार संस्कारित” नेत्यांना वठणीवर आणावे लागेल. म्हणूनच भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माणिकराव कोकाटे प्रकरणात कोकाटेंची थेट आमदारकीच रद्द करायची मागणी केली. ती फडणवीस यांनी रेटून धरावी लागेल, फडणवीस यांनी ती मागणी रेटून धरली, तर माणिकरावांची आमदारकी रद्द होणे कठीण नाही.
– मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरा
पण त्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांना आपले मुख्यमंत्री पदाचे अधिकार पूर्णपणे वापरणे आवश्यक आहे. उगाच एकनाथ शिंदे आणि अजित दादांना आपल्या बरोबरीने वागवण्याचे कारण नाही. पण मुख्यमंत्री आहोत आणि तुम्ही दोघे उपमुख्यमंत्री आहेत हे त्यांना जाणीवपूर्वक सांगावे लागेल. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिले होते. नवाब मलिक यांच्यासारख्या गुन्हेगाराला महायुतीत स्थान मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट बजावले होते. फडणवीसांच्या या “लेटर बॉम्ब”चा व्यवस्थित “राजकीय स्फोट” होऊन नवाब मलिक यांना मुकाट्याने महायुतीच्या बाहेर बसावे लागले होते. फडणवीसांनी आता तशाच प्रकारचा आक्रमक पवित्र घेऊन “पवार संस्कारित” दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांना वठणीवर आणले पाहिजे. आपले सरकार काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार नाही, तर हे भाजपच्या वर्चस्वातले महायुतीचे एकजिनसी सरकार आहे, हे दाखवून द्यावे लागेल.
– “पवार संस्कारितां”ची मस्ती उतरवावी लागेल
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्र्यांची वर्तणूक आणि अजितदादांच्या मंत्र्यांची वर्तणूक यात मूलभूत फरक करावा लागेल. कारण एकनाथ शिंदेंचे मंत्री भावनिक वागले आणि शिवसेनेच्या स्टाईलने वागले, तरी “पवार संस्कारितांच्या अंगात असलेली मूलभूत सत्तेची मस्ती शिवसेनेच्या मंत्र्यांच्या अंगात नाही. त्याउलट “पवार संस्कारित” प्रत्येक नेत्याच्या अंगात सत्तेची मूलभूत मस्ती आहे, म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांच्या आक्रमक स्वभावाखालच्या दादागिरीला चापच लावावा लागेल, तरच हे पवार संस्कृत नेते सरळ होतील. अन्यथा ते सत्तेच्या मस्तीतून फडणवीस सरकारची प्रतिमा काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारच्या प्रतिमेसारखी मलीन करत राहतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App