पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय, माईंडसेट बदलावा लागेल; पण फडणवीस साहेब, आधी नेतृत्वातले घुसखोर बाहेर काढावे लागतील!!

पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय. आमच्याच लोकांना कंत्राटे द्या. आमच्याच लोकांना कामावर ठेवा. आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम करा हा माईंडसेट बदलावा लागेल, तरच पुणे ग्रोथ हब सारखी संकल्पना काम करू शकेल. तशा प्रकारच्या योजना यशस्वी होतील, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ग्रोथ हब संकल्पनेच्या कार्यक्रमात पुण्यातल्या दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिला.

पुण्याच्या औद्योगिक विकासाची नस आणि तिच्यातला अडथळा फडणवीसंनी बरोबर ओळखून त्यावर बोट ठेवले. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सगळे बरोबर होते. त्यावर रोहित पवारांनी नेमके कोण दादागिरी करतोय??, फडणवीस यांनी नावे घ्यावीत, असा खोचक सल्ला देऊन आपली “पवार बुद्धी” दाखवून दिली. फडणसांनी दादागिरीचा उल्लेख फक्त पुणे ग्रोथ हब कार्यक्रमातच केला असे नाही, तर त्याआधी लोकमान्य टिळक पुरस्कारात देखील तो उल्लेख केला होता पुण्यात दोन दादा आहेत एक दादा शांत आहेत, तर दुसरे दादागिरीतून दिसतात, असा टोला त्यांनी लगावला होता. तो अजितदादांना बरोबर टोचला होता म्हणूनच त्यांनी मी दादागिरी करतो का??, असा जाहीर सवाल पडणे विसरणार त्याच कार्यक्रमात केला होता.

त्यामुळे पुण्यातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात दादागिरी हा शब्द गाजला. पण त्या पलीकडे जाऊन ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दादागिरी या शब्दाचा वापर दोन वेगवेगळ्या भाषणांमध्ये केला, ती दादागिरी रोखायची जबाबदारी कुणावर आहे आणि ती कोण पार पाडणार??, हा खरा सवाल आहे. वास्तविक दादागिरी या शब्दाचा वापर करणारे देवेंद्र फडणवीस स्वतःच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्याचा प्रमुख या नात्याने पुण्यातली त्यांनीच उल्लेख केलेली दादागिरी संपविणे आणि माईंडसेट बदलविणे हे त्यांच्याच हातात आहे. ते त्यांनीच केले पाहिजे‌.



– बारामतीकरांना चाप लावायला पाहिजे

महाराष्ट्रातल्या मतदारांनी भाजपला भरभरून कौल दिला असताना बारामतीतून पुण्याहून दादागिरी करणाऱ्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवायचे काहीच कारण नव्हते, उलट त्या दादागिरीला चाप लावायला हवा होता. प्रसंगी कठोर कारवाई करायला हवी होती, पण फडणवीस आणि त्यांच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी दादागिरी करणाऱ्यांना सत्तेच्या खुर्चीवर आणून ठेवले. त्यामुळे त्यांच्याच घरातल्या विरोधकांना फडणवीस यांना खोचक सवाल करण्याची संधी मिळाली.

पुण्याच्या औद्योगिक विकासासाठी माईंडसेट बदलायची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली ते खरेच आहे, पण त्याआधी फडणवीस यांनी पुणे बाह्य नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याऐवजी पुण्यातल्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे ही जास्त गरज आहे. बारामतीतून पुण्यात येऊन पुण्यावर दादागिरी करणारे किंवा कोल्हापुरातून पुण्यातील दादागिरी न करता शांत बसणारे या दोघांनाही प्रोत्साहन देण्यापेक्षा पुण्याचे नेतृत्व पुण्यातून तयार करणे ही खरं म्हणजे फडणवीसांची आणि त्यांच्या दिल्लीतल्या वरिष्ठांची जबाबदारी आहे तिथे पूर्णत्वाने पार पाडत नाहीत, असे येथे म्हणणेच नाही, पण बारामतीतून पुण्यात येऊन दादागिरी करणाऱ्यांना चाप लावणे हे मात्र त्यांनी केले नाही ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.

– पुण्यातले नेतृत्व तयार करा

याबाबतीत भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो हे काँग्रेसपेक्षा निश्चित कमी पडले. या दोन्ही पक्षांनी काँग्रेस सारखे स्थानिक नेतृत्वच तयार केले नाही. भाजपने ही प्रक्रिया दीर्घकाळ लांबवत ठेवली. त्यात वेगवेगळे प्रयोग करत राहिले.

– बारामतीकरांना बाहेर काढा

बारामतीकरांनी तसे करणे शक्यच नव्हते. कारण पुण्यातून नेतृत्व उदयाला आले असते, तर त्याने पहिले आव्हान बारामतीकरांनाच दिले असते, हे बारामतीकरांनी अगदी जुन्या काळापासून पाहिले आणि अनुभवले होते. विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक यांनी पुण्यात काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला, त्यावेळी थोरल्या बारामतीकरांना सुरेश कलमाडींना हाताशी धरून त्यांचे वर्चस्व संपवावे लागले होते. पण सुरेश कलमाडींनी देखील नंतर बारामतीकरांचे ओझे आपल्या खांद्यावरून उतरवून ठेवले होते. त्यामुळे बारामतीकरांना पुण्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळतच नव्हती. ती संधी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या काळात पुढील वर्षी मिळाली. त्यानंतर भाजपने त्यांना सत्तेच्या खुर्चीवर अकारण बसवून आणून उपलब्ध करून दिली.

आता ज्यावेळी फडणवीस स्वतः पुण्यातल्या दादागिरीचा आणि माईंडसेट बदलायचा उल्लेख केला, त्यावेळी खरं म्हणजे ही दादागिरी पुण्याबाहेर पाठवायची जबाबदारी त्यांचीच आहे. ती त्यांनी खऱ्या अर्थाने पार पाडली, तर पुणे ग्रोथ हब सारखी संकल्पना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही.

Devendra fadnavis must himself come forward to end the dadagiri in Pune

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात