नाशिक : बड्या नेत्यांच्या उलट्यापाट्या भेटीगाठी, एकमेकांची खेचाखेची; पण कार्यकर्त्यांच्या मात्र ओढाताणी!! असला प्रकार महाराष्ट्रात सुरू झालाय. Devendra fadnavis meets Raj Thackeray
महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्या बरोबर नेत्यांच्या उलट्या पालट्या भेटीगाठी सुरू झाल्या. शिवसेना आणि मनसे एकत्र येणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मध्येच टांग मारून राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यामुळे ठाकरे गटाचे आणि मनसेचे नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात फेकले गेले. 14 जून च्या वाढदिवसानिमित्त मला भेटायला येऊ नका, असे पत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना उद्देशून लिहिले म्हणजे मनसैनिकांची भेट घेण्यास त्यांनी अप्रत्यक्षपणे नकार दिला, पण देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते आवर्जून भेटले. त्यामुळे मनसैनिक संभ्रमात गेले. पण ठाकरे बंधू एकत्र येणार की फडणवीस दोघांनाही कात्रजचा घाट दाखवणार याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. पण मुंबईतल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांची खरंच भेट झाली की नाही, याची कुठलीही अधिकृत बातमी कुठल्याच माध्यमांना मिळाली नाही. पण या भेटीची राळ मात्र माध्यमांनी उडवून दिली.
CM Fadnavis : कोणताही निधी बेकायदेशीर वळवलेला नाही, लाडकी बहीणवरून मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही गट एकत्र येणार बारामतीत मोठी घडामोडी घडणार या बातमीची राळ माध्यमांनी उडवली. दोन्ही राष्ट्रवादीतून एकच आहेत. त्यांना फक्त सत्तेची वळचण हवी आहे. मग ती वळचण कुणाचीही असली तरी चालणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीला कुठलाही धरबंध नाही. पण तरी देखील दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तर आपल्या राजकीय भवितव्याचा पत्ता भाजप कट करेल याची भीती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटल्यामुळे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र करणाऱ्या विरोध केला आहे. पण माळेगाव मध्ये कसेही करून स्वतःच्या ताब्यात सत्ता ठेवण्यासाठी पवार काका पुतणे त्यांनी एक होणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे पवारांच्या वर्चस्वाविरुद्ध कायम लढा देणाऱ्या बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तिसरीकडे नाशिक मध्ये भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेच पाहिजेत, असा हट्ट करणाऱ्या शॅडो पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे आमदार आणि नगरसेवकांना “गप्प राहा” असा दम भरला आहे. नाशिकमध्ये बाकीच्या पक्षांनी ओवाळून टाकलेले कोणीही भाजपमध्ये घ्यायचा सपाटा गिरीश महाजन यांनी लावला आहे. त्यासाठी ते कुठला फिल्टर लावायला तयार नाहीत. सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना भाजपमध्ये घेण्यास इथल्या स्थानिक आमदारांचा आणि नगरसेवकांच्या विरोध आहे. तो त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढे बोलून दाखवला आहे, तरी देखील गिरीश महाजन यांनी सध्या भाजप प्रवेशाच्या बातम्या बद्दल गप्प राहा, अशी दमबाजी करून आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले यांना गप्प केले आहे.
या सगळ्यात नेत्यांच्या उफराट्या भेटीगाठी सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्याच मित्र पक्षांना दगा देऊन आपला पक्ष रेटून वाढवायचे काम सुरू आहे. त्यासाठी एकमेकांच्या आघाडीतल्या किंवा युतीतल्या पक्षांना चुचकरायचे काम सुरू आहे. असेल ते विटवा आणि नसेल ते भेटवा, असला प्रकार भाजप मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांनी सुरू केलाय यामध्ये पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र ओढाताण होते आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App