विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Devendra Fadnavis देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्येही नाहीत. देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक बारावा आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने सोमवारी एक अहवाल सादर केला आहे. Devendra Fadnavis
देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती जाहीर केली आहे. यात देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आणि सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांची माहिती देण्यात आली आहे.Devendra Fadnavis
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू देशाचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची संपत्ती 931 कोटी रुपयांहून अधिक आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा क्रमांक संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पेमा खांडू यांची संपत्ती 332 कोटी रुपयांहून अधिक आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या हे संपत्तीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 51 कोटी रुपये इतकी आहे. देवेंद्र फडणवीस हे बाराव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 13 कोटी 27 लाख 47 हजार आहे.Devendra Fadnavis
अकराव्या क्रमांकावर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा असून त्यांची संपत्ती 13 कोटी 90 लाख आहे. दहाव्या क्रमांकावर मेघालयचे मुखमंत्री कॉनरड संगमा असून संपत्ती 14 कोटी सहा लाख, नवव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा असून संपत्ती 17 कोटी 27 लाख आहे. आठव्या क्रमांकावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असून संपत्ती 25 कोटी 37 लाख आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमलला रेड्डी 30 कोटी चार लाख रुपये संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत. तर सहाव्या क्रमांकावर पुद्दुचेरीचे एन .रंगास्वामी असून संपत्ती 38 कोटी 39 लाख आहे. पाचव्या क्रमांकावर मध्यप्रदेशचे मोहन यादव असून त्यांची संपत्ती 42 कोटी 4 लाख आहे. चौथ्या क्रमांकावर नागालँडचे निफियू रिओ असून असून त्यांची संपत्ती 46 कोटी 95 लाख आहे.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची संपत्ती केवळ 15 लाख रुपये आहे. त्यानंतर जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची संपत्ती 55 लाख रुपये इतकी आहे. या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची संपत्ती 1.18 कोटी रुपये आहे. गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत पिनराई यांचा क्रमांक तिसरा आहे.
देशातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 52.59 कोटी रुपये आहे. भारताचे 2023-2024 साठीचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNI) अंदाजे 1,85,854 रुपये होते. तर मुख्यमंत्र्यांचे सरासरी वैयक्तिक उत्पन्न 13,64,310 रुपये आहे. म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा ते 7.3 पट अधिक आहे.देशाच्या 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपये आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर 180 कोटीचे कर्ज देखील आहे. अहवालानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यावर 23 कोटी रुपये आणि नायडू यांच्यावर 10 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. 13 (42 टक्के ) मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती घोषीत केली आहे. तर 10 (32 टक्के ) मुख्यमंत्र्यांनी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. त्यात खूनाचा प्रयत्न, अपहरण, लाचखोरी आणि धमक्या देणे अशी प्रकरणे आहेत. देशातील 31 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ दोन महिला मुख्यमंत्री आहेत. त्यात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App