विशेष प्रतिनिधी
मुंबई : मदतीचे निकष आणि नियम यांचा कुठलाही अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत देऊ, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून मदतीची घोषणा केली. Devendra Fadnavis
कालच सरकारने दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम रिलीज केली. शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत, पण त्यासोबत ज्यांच्या घराचं नकुसान झालेलं आहे. अन्नधान्याच नुकसान झालय, त्यांनाही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय केलेला आहे की, कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करुन नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यामध्ये येऊन नुकसानीची पाहणी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
आपत्ती सुरु असताना पैसा रिलीज करणं सुरु केलेलंआहे. दिवाळीपूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की, “ओला दुष्काळ बोली भाषेतली टर्म आहे. पावसामुळे जे नुकसान झालय त्या सर्वाची नुकसानभरपाई, टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.
पहिल्यांदा तातडीची मदत
पहिल्यांदा तातडीची मदत हा विषय महत्वाचा आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. केंद्र सरकारही मदत करणार आहे. एनडीआरएफला काही एडवान्स पैसे दिलेले असतात. ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो काही निधी लागेल, तो देण्याच आश्वासन मंत्रिमंडळाने दिले आहे.
नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं
काही ठिकाणी पाणी अचानक सोडल्यामुळे नुकसान झालं, त्या प्रश्नानावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. “काही ठिकाणी पाऊस हा ढगफुटीसारखा कोसळला. त्यामुळे नेहमीसारखं रेग्युलेट करुन पाणी सोडणं शक्य नव्हतं. या संदर्भात कोणी काही चूक केलीय का हे तपासू. पाऊस असा झाला की, रेग्युलेट फ्लो शक्य नव्हता. अनरेग्युलेटेड कॅचमेटमध्य ढगफुटीसारखा पाऊस झाला.
निर्सगाचे चक्र बदलले
निर्सगाच चक्र बदलेले आहे. वातावरण बदलाचा परिणाम या ठिकाणी होत आहे. आपण याकडे लक्ष देणं गरजेच आहे. खरडून गेलेल्या जमिनी संदर्भात काही नॉर्म्स आहेत. अधिकचे पैसे देणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत करणं गरजेच आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App