विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सध्या महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहेतच. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाने आता ते भविष्यातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.Devendra Fadnavis
मुंबई तक या संकेतस्थळाला दिलेल्या एका मुलाखतीत सरदेसाई बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द खूप सारखी आहे. त्यामुळेच आता ते या शर्यतीत आल्याचेही त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
सरदेसाई म्हणाले, आजच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील नेते नंबर वन आहेत यात काहीही शंका नाही. मला काही दिवसांपूर्वी कोणीतरी विचारले नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण? दिल्लीत हा प्रश्न नेहमी विचारला जातो. एक वर्षापूर्वी लोक म्हणायचे अमित शहा, योगी आदित्यनाथ. या दोन व्यक्ती सर्वात पुढे होत्या. काही काही लोक नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचे पण नाव घ्यायचे. आता त्या लिस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पण नाव ठेवावे लागेल.
सरदेसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकिय कारकीर्दीत साम्य आहे. नरेंद्र मोदी यांचा गुजरात मध्ये उदय झाला. त्यानंतर केशुभाई पटेल, शंकरसिंह वाघेला, काशीराम राणा, सुरेश मेहता यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना गुजरात सोडावे लागले. पण एकदा ते मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा पूर्णपणे उत्कर्ष झाला. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सोडावा लागला नाही पण पण ते बिहारचे सरचिटणीस झाले. गोव्याचे प्रचार प्रमुख झाले. उपमुख्यमंत्री झाले. असे वाटले की त्यांच्या करिअरला कायमस्वरूपी सेटबॅक झाला.
पण विधानसभेतील मोठ्या विजयानंतर असे वाटते आहे की त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केली तर ते भविष्यातील पंतप्रधान असू शकतील. महाराष्ट्रातील कोणीतरी पंतप्रधान व्हावे हे महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न आहे. 2024 नंतर ज्या प्रकारचे निवडणूक निकाल आले आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी हे स्थान बनविले आहे. अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांचे नावही ठेवावे लागेल.
राजदीप सरते म्हणाले, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात असे मी म्हणालो. पण पाच महिन्यांपूर्वी निवडणुकीनंतर ते राजीनामा देत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App