देवेंद्र फडणवीस : महापालिका टू जिल्हा परिषद व्हाया दावोस; एक राजकीय प्रवास!!

नाशिक : देवेंद्र फडणवीस : महापालिका टू जिल्हा परिषद व्हाया दावोस एक राजकीय प्रवास!!, अशाच शब्दांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या महिनाभरातल्या कर्तृत्वचे वर्णन करावे लागेल.

कारण 29 महापालिकांच्या निवडणुका, दावोस दौरा आणि त्यानंतर 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका, असा देवेंद्र फडणवीस यांनी सर्वत्र संचार केला. यातल्या पहिल्या दोन कामगिरी करून ते कमालीचे यशस्वी झाले. दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या कामाला लागले. Devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी 29 महापालिकांमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून त्यापैकी 25 महापालिकांमध्ये महायुतीची एकहाती सत्ता आणून दाखवली. काँग्रेस, ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांना त्यांनी महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये नेस्तनाबूत केले. वास्तविक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही त्यांचे ऐकले पाहिजे, असे म्हणून सुप्रिया सुळे यांनी आपण स्वतः प्रचारात आघाडी घेऊ, असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी आघाडी घेणे तर सोडाच, उलट कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत घरात बसणे पसंत केले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भातल्या महापालिकांवर आणि मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले होते. ठाकरे सेनेने फक्त मुंबई आणि ठाण्यापुरतेच आपल्या स्वतःला मर्यादित करून ठेवले होते. त्या उलट मुख्यमंत्र्यांनी महापालिकांची निवडणूक अतिशय गांभीर्याने घेऊन सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये जाऊन सभा घेतल्या होत्या. प्रचार केला होता. त्याचे फळ त्यांना मिळाले. 29 पैकी 25 महापालिकांमध्ये महायुतीचे सत्ता आली.


महाराष्ट्र @ दावोस : AI, इनोव्हेशन सिटी ते रायगड – पेण ग्रोथ कॉरिडॉर आर्थिक प्रगतीची घोडदौड!!


– दावोस दौऱ्याची मुशाफिरी

त्यानंतर ते दावोस दौऱ्यावर निघून गेले. तिथे त्यांनी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय मुशाफिरी केली. तिथे त्यांनी वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी तब्बल 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 75 पेक्षा जास्त करार केले. 40 लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्याच कंपन्यांशी स्वित्झर्लंड मधल्या दावोस मध्ये जाऊन करार करत असल्याची टीका विरोधकांनी केली, पण फडणवीस यांनी आकडेवारी सह थेट परकीय गुंतवणुकीची गोष्ट सांगून विरोधकांची तोंडे गप्प केली.

– बारा जिल्हा परिषदांच्या प्रचारात

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन 29 महापालिकांच्या महापौर निवडीत लक्ष घातले. त्याचबरोबर त्यांनी 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा सुद्धा आढावा घेतला. महापालिका निवडणुका जिंकल्यानंतर बारा जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्याचे आवाहन पेलले. त्यांनी बाराच्या बारा जिल्हा परिषदांमध्ये जाऊन प्रचार करायचा निर्णय घेतला. यापैकी त्यांच्या दोन सभा पुणे जिल्ह्यात होणारा असून पुणे जिल्हा परिषदेसाठी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आव्हान देणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये अजित पवारांनी भाजपला आव्हान देऊन आक्रस्ताळी भाषा वापरली होती. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना त्याच आक्रस्ताळ्या भाषेत उत्तर दिले नव्हते. त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांना अजित पवारांना जशास तसे उत्तर द्यायला भाग पाडले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजपने जिंकल्या.

– अजित पवारांचा मोडतील काटा

त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रचाराला उतरायच्या तयारीला लागले. अजित पवारांनी अजून तरी आक्रमक भाषा वापरलेली नाही त्यामुळे फडणवीस त्यांना त्याच आक्रमक भाषेत उत्तर देण्याची शक्यता नाही पण अजित पवारांनी महापालिका निवडणुकांमध्ये केलेली चूक जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये केली तर मात्र फडणवीस त्यांच्या शिलेदारांमार्फत अजित पवारांचा काटा ढिल्ला करून तो मोडल्याशिवाय राहणार नाहीत.

Devendra fadnavis : from municipal election to ZP elections via Davos

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात