मुंबईतील ‘कोस्टल हायवे’ला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यासंदर्भातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.  ही मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. आता ही घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. Devendra Fadnavis first reaction on the decision after of  Chhatrapati Sambhaji Maharaj name give to the Coastal Highway in Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणातात, ‘’मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!’’

याशिवाय ‘’१६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्यावतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे.’’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तर ही घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘’छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.’’

Devendra Fadnavis first reaction on the decision after of  Chhatrapati Sambhaji Maharaj name give to the Coastal Highway in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात