सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे
प्रतिनिधी
नागपूर : मागील सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचं आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
फडणवीस म्हणाले, ‘’मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. मी तर C20 मध्ये होतो, परंतु काही वेळापूर्वी आणि दुपारीदेखील माझी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली होती. काय मुद्दे आपण त्यांच्यासमोर ठेवले पाहिजे याचीही चर्चा झाली होती. मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा जो काही प्रश्न होता, तो आम्ही सोडवला आहे. म्हणजे कुठेही अहंकार न ठेवता, त्यांना जी सोशल सुरक्षा हवी आहे, त्यांना निवृत्तीनंतर जे लाभ हवे आहेत. त्या संदर्भातील जे तत्व आहे ते तत्व आम्ही मान्य केलं आहे. आता त्याचं कामकाज कसं करायचं यासाठी ही समिती काम करत आहे.’’
मोठी बातमी! सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
याचबरोबर ‘’सरकारने आडमूठी भूमिका न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा मी सरकारच्यावतीने हे सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचे आहेत त्यामुळे त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल. ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. आमची त्यात कुठेही आडमूठी भूमिका नाही.’’ असंही फडणीसांनी सांगितंल.
LIVE | Media interaction in #Nagpur https://t.co/imjzfG7psE — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 20, 2023
LIVE | Media interaction in #Nagpur https://t.co/imjzfG7psE
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 20, 2023
याशिवाय ‘’जे काही तीन-चार मुद्दे ठरले आहेत, त्यावर ही समिती अहवाल सादर करेल. त्या आधआरावर पुढील कारवाई आपल्याला करता येईल. शेवटी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की संवादातून तोडगा निघतो. तो संवाद झालेला आहे, म्हणून मी कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त करतो आणि पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न होता की संप होऊच नये, पण शेवटी तो संप झाला. आज तो मागे घेतला जातोय, ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही पुढे देखील कर्मचाऱ्यांसोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू.’’ असंही शेवटी फडणवीस यांनी सांगतिलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App