उद्धव ठाकरे, तुमचे नड्डे केव्हा सैल होतील हे समजणारही नाही; देवेंद्र फडणवीसांचे खणखणीत प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल पाटण्यात जाऊन विरोधकांच्या बैठकीत सामील झाल्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आता मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले तर चालते का??, असा बोचरा सवाल केला होता. त्याचवेळी त्यांनी ही मोदी हटाव बैठक नसून परिवार बचाव बैठक असल्याची टीका केली होती Devendra Fadnavis’ dignified reply to uddhav thackeray

परिवार बचाव ही टीका उद्धव ठाकरेंना भलताच टोचली आणि त्यांनी आज पातळी सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे व्हाट्सअप चॅट बाहेर आले तर तुम्हाला शवासनच करावे लागेल. दुसरे कोणते आसन तुम्हाला झेपणार नाही. केवळ शवासनावर झोपून राहावे लागेल. “योगा डे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर शरसंधान साधले होते.

त्यानंतर भाजप आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक भाषेत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंचे पुरते वाभाडे काढले. मी, माझे कुटुंब आणि भाजप परिवार ही खुली किताब आहे पण तुम्हाला पुस्तकेच काढायचे असतील तर मुंबईला कोणी लुटले?, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री पद घरात कसे ठेवले?, यावर लिहा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले

– फडणवीस यांनी केलेले ट्विट असे :

मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे ! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका. चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा…

  •  सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
  •  मुंबईला कुणी लुटले यावर…
  •  मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
  •  मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
  •  100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
  •  तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…

उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर भाजपने यांना प्रस्तुत तर दिले, पण त्या पलीकडे जाऊन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे ट्विट करून उद्धव ठाकरेंच्या भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर फडणवीसांच्या आक्रमकतेची चर्चा आहे.

Devendra Fadnavis’ dignified reply to uddhav thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात