विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी इथून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आहे तसेच राज्याच्या कोणत्या भागात व कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक आली आहे, यांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.CM Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दावोस दौरा यह अतिशय यशस्वी झाला आहे. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे केले आहेत ते 30 लाख कोटी रुपयांचे आहेत. अजून 7-10 लाख कोटी पुढच्या काळात होणार आहे. ही जी काही गुंतवणूक आहे, यात इंडस्ट्री सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, कृषी क्षेत्र आहे, सगळ्याच क्षेत्रात गुंतवणूक आपल्याकडे येत आहे. यातील 83 टक्के जे काही करार आहेत, यात एफडीआय आहे. 16 टक्के गुंतवणूक अशी आहे ज्यात फायनॅनष्यल इंस्टीट्यूट असतील किंवा टेक्निकल आहेत, या गुंतवणुकी एफडीआय कमी आहे, पण फॉरेन टेक्नॉलजी आहेत.CM Fadnavis
कोणत्या देशांतून गुंतवणूक आली?
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकूण किती देशातून गुंतवणूक आपल्याकडे येत आहे, याचा हिशोब लावला तर एकूण 18 देशातून ही गुंतवणूक आपल्याकडे येत आहे. यात अमेरिका, यूके, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापुर, नेदरलँड, जपान, इटली, यूएई, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रीया, अशा अनेक देशांतून गुंतवणूक येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्राचे परफॉर्मेंस सगळ्यात चांगला राहिला आहे. एक प्रकारे या कागदावरच्या घोषणा नाहीत. अनेकवेळा लोकांचा गैरसमज होत असतो, या गुंतवणुकीचा कालावधी जो असतो, हा 3 वर्षांपासून ते 7 वर्षांपर्यंत असते.
कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक झाली?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक मोठ्या कंपन्या आपल्याकडे गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. यासोबत कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक येत आहे ते देखील महत्त्वाचे आहे. यात क्वांटम कम्प्यूटिंग, एआय डेटा सेंटर, एआय टेक्नॉलजी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब सेमीकंडक्टर्स, जीसीसी, आपल्याकडे नवीन वेव ही जीसीसीची आहे. तसेच फूड प्रोसेसिंग, रिनिवेबल एनर्जि, ग्रीन स्टील, ईव्ही, अर्बन ट्रांस्फॉर्मेशन, शिप बिल्डिंग, एड्युकेशन, फीनटेक, मॅजिस्टिक आणि टेक्सटाइल तसेच डिजिटलमध्ये गुंतवणूक आली आहे.
महाराष्ट्रात कुठे किती गुंतवणूक झाली?
आता गुंतवणूक आली कुठे? तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ही गुंतवणूक आली आहे. कोकणचे क्षेत्र असेल किंवा एमएमआरचे क्षेत्र आहे, विदर्भात 13 टक्के गुंतवणूक आली आहे, 50 टक्के गुंतवणूक महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये गुंतवणूक आली आहे. मराठवाड्याचे जे नवीन मॅगनेट तयार झाले आहे, ते आहे छत्रपती संभाजीनगर, याही ठिकाणी जवळपास 55 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. नागपूर विभाग तसेच विदर्भ जो आहे, त्या ठिकाणी जवळपास 2 लाख 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. याचसोबत पुणे, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये देखील चांगली गुंतवणूक आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App